पुणे: पुण्यात भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील भयानक घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली आहे. भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने वृद्ध व्यक्तीला जोरदार धडक दिली. पुण्यातील दशभुजा गणपती मंदिराजवळील ही घटना घडली आहे. परशुराम वैश्यंपायम (82) असे अपघातात जखमी झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम वैश्यंपायम हे संध्याकाळी सहकारनगर भागात असलेल्या दशभुजा गणपतीजवळ थांबले होते. त्या ठिकाणाहून भरधाव वेगात आलेल्या एका दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.

अपघातात जखमी झालेल्या वयोवृद्ध व्यक्तीला एका खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला, अपघातात दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेल्या हे दोघे जखमी असून त्या दोघांना सुद्धा रुग्णालयात दाखल केले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत पर्वती पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया  सुरू होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा रस्त्यांवरून चालणाऱ्या लोकांच्या जीवाचा प्रश्न समोर आला आहे. या घटनेतील जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.