Pune Band garden accident: पुण्यात भरधाव मोटारीने मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना काही तासांपू४वीच घडली होती. बंडगार्डन मेट्रो स्थानकाजवळ (Band garden Metro station) रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. यामध्ये ऋत्विक भंडारी, यश भंडारी आणि खुशवंत किशोर टेकवानी या तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. आता एका प्रत्यक्षदर्शीने या संपूर्ण अपघाताची आपबीती सांगितली आहे. अपघाताच्यावेळी गाडीचा वेग हा 120 ते 130 Kmph असावा. गाडीची धडक इतकी भीषण होती की, मेट्रोच्या पिलरला धडकताच गाडीचा चेंदामेंदा झाला. या प्रत्यक्षदर्शीने अपघातातील एका तरुणाला सीपीआर दिला. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (Pune News)
या अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र, गंभीर जखमी असलेल्या खुशवंत टेकवाणी याच्यावर उपचार सुरु होते. परंतु, सोमवारी पहाटे खुशवंत टेकवाणी याचीही प्राणज्योत मालवली. दरम्यान, आता पोलिसांनी अपघातात मृत्यू झालेल्या तिन्ही तरुणांचे रक्ताचे नमुने केमिकल आणि तांत्रिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या तिघांनी तिघांनी मद्दप्राशन केले होते का नाही, हे प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल.
Pune News: बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ अपघात नेमका कसा घडला?
पुण्यातील कोरेगावपासून काही अंतरावर असलेल्या बंडगार्डने मेट्रो स्टेशनच्या परिसरात रविवारी पहाटे 4 वाजून 55 मिनिटांनी हा अपघात घडला. भरधाव कार वेगात मेट्रोच्या खांबाला धडकली. अपघातामध्ये ऋत्त्विक भंडारी आणि यश भंडारी या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आणि खुशवंत टेकवाणी गंभीररित्या जखमी झाला होता. ऋत्त्विक भंडारी आणि यश भंडारी हे दोघेही पिंपरीत राहणारे होते. तर खुशवंत टेकवाणी हा एमआयटीचा विद्यार्थी असून तो मूळचा बीडचा आहे. या तिघांचे फोन मिळाले असून पोलिसांनी सीडीआरच्या मदतीने त्यांच्या कुटुंबीयांची माहिती मिळवली. यापैकी एका तरुणाने आईला, मी पार्टीला जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या तिघांनी मद्यप्राशन केले होते की नाही, या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरु आहे.
आणखी वाचा