Pune Accident Shiv Jayanti 2026: पुण्याच्या मावळमध्ये शिवजयंती दिनीचं दोन शिवभक्तांवर काळाने घाला घातलाय. शिवज्योत घेऊन शिंदेवाडीकडे निघालेल्या दोन शिवभक्तांचा अपघातात मृत्यू झालाय. ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे या शिवभक्तांची नावं होती. विसापूर किल्ल्यावरुन शिवज्योत घेऊन हे शिवभक्त स्वतःच्या गावी म्हणजे शिंदेवाडीला मोठ्या उत्साहात परतत होते. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव जवळ शिवज्योत घेऊन हे शिवभक्त पोहचले. तेव्हा मध्यरात्रीचे दीड वाजले होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने एक कार बेदरकारपणे आली त्या कारने दुभाजक भेदत या शिवभक्तांना ही चिरडले.  शिवज्योत घेऊन धावत असलेल्या ओंकार आणि दर्शनचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने आंदर मावळात शिवजयंतीच्या दिवशी शोककळा पसरली आहे. (Maval Accident news)

Continues below advertisement

Pune News: पुण्यात शिवजंयतीच्या मिरवणुकांसाठी वाहतुकीत बदल

आज राज्यभरात तिथीनुसार शिवजयंती साजरी होत आहे. यानिमित्त पुणे शहरात वाहतुकीत बदल  करण्यात आले आहेत. पुण्यातील अनेक भागात मिरवणुका असल्या कारणाने लक्ष्मी रोड, नेहरू रोड, शिवाजी रस्ता, बाजीराव रोड या रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग कोणते?

Continues below advertisement

* जिजामाता चौकातून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना स. गो. बर्वे चौक– जंगली महाराज रोड खंडोजीबाबा चौ- टिळक चौ- टिळक रोड मार्गे वळविण्यात येईल.

* दारुवाला पुलाकडून फडके हौद चौक व जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक दारुवाला पुल चौकातूनच पर्यायी मार्गाने सोडण्यात येईल. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक केळकर रोडमार्गे वळविण्यात येईल.

* मिरवणूक लक्ष्मी रोडवर असताना सोन्या मारुती चौकापर्यंत लक्ष्मी रोडवरील वाहने संत कबीर चौकाकडून वळविण्यात येतील.

* पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणारी वाहने टिळक रोड- अलका टॉकीज चौ- एफ.सी. रोडमार्गे जातील.

* मिरवणुका सुरू झाल्यानंतर आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौक व बाजीराव रोडकडे जाणारी वाहतूक बंद करून ती केळकर रोडकडे वळविण्यात येईल.

* गाडगीळ पुतळा परिसरात मिरवणूक असताना वाहने सावरकर भवन पुल – बालगंधर्व चौक किंवा टकले हवेली मार्गे वळविण्यात येतील.

* शनिवारवाड्याकडे जाणारी वाहतूक कॉसमॉस बँक जंक्शन- टिळक पूल- मनपा किंवा टकले हवेलीमार्गे सोडण्यात येईल.

आणखी वाचा

शिवजयंतीनिमित्त शिवभक्तांना, तुमच्या मित्रपरिवाराला द्या भरभरुन शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश