पुणे: देशभरात उद्या 26 एप्रिल रोजी राम नवमी निमत्ताने वाहतूक पुणे (Pune) शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होणार असून पुणे वाहतूक पोलिसांनी काही रस्ते बंद करण्यात येईल, अशी माहिती दिली. राम नवमी (Ram navami) निमित्ताने उद्या शहरात विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून मिरवणूक तसेच विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यामुळे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून पर्यायी मार्ग देत काही ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामध्ये, प्रामुख्याने पुण्यातील बाजीराव रोड आणि लष्कर परिसरातील रस्त बंद राहणार आहेत.

Continues below advertisement

पुण्यातील बाजीराव रोड आणि लष्कर परिसरातील रस्ते बंद राहणार आहेत. दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत या वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होणार असून पुण्यातील काही रस्ते बंद राहणार आहेत. 

बाजीराव रोड परिसर

पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. मात्र, पर्यायी मार्गाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग : टिळक रोड–अलका टॉकीज चौक – खंडोजी बाबा चौक मार्गे वाहतूक वळविण्यात येईल.

Continues below advertisement

लष्कर विभाग

वाय जंक्शन येथे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. एम.जी.रोडवरील वाहतूक 15 ऑगस्ट चौकातून उजवी/डावी वळविण्यात येईल.महंमद रफी चौकानंतरची वाहतूक ईस्ट स्ट्रीटमार्गे वळविण्यात येईल.कोहिनूर हॉटेल परिसरातून जाणारी वाहतूक भोपळे चौक व इतर पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार.

हेही वाचा

Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द