Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
मिळालेल्या माहितीनुसार निलेश पाटील हे पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावरती होते. तर त्यांनी पुण्यामधील औंध परिसरातील राहत्या घरामध्ये स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरी स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केल्याने पुणे पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश भाऊसाहेब पाटील असं त्यांचं नाव आहे. त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार निलेश पाटील हे पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावरती होते. तर त्यांनी पुण्यामधील औंध परिसरातील राहत्या घरामध्ये स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
दरम्यान, त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणास्तव केली आहे याबाबत अजून तपशील कळू शकलेला नाही. त्यांना काही मानसिक त्रास होता की अन्य काही व्यक्तिगत कारणातून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही. मात्र एका अधिकाऱ्यानेच अशा पद्धतीने स्वतःचं आयुष्य संपवल्याने पुणे पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
गोळी झाडून झालेल्या खून प्रकरणाचा उलघडा
दरम्यान, कारेगाव (ता. शिरूर) येथील पाणी प्लँटमध्ये काम करणाऱ्या हमजा उस्मान शेख (वय 39 ) यांच्या गोळी झाडून झालेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी उलगडा केला आहे. पाणी प्लँटचे मालक विकास नवले यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती; मात्र हल्लेखोरांनी नवले समजून त्यांच्याकडे काम करणाऱ्या हमजा शेख यांच्यावर गोळी झाडून त्यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हमजा शेख यांच्या पत्नी अबिताबी हामजा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 29 सप्टेंबर रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जागेच्या वादातून कटाचा सूत्रधार
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि इतर तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासात सार्थक कोहकडे याचा विकास नवले यांच्याशी जागेवरून वाद असल्याचे समोर आले. त्यातून कोहकडे याने विकास नवले यांच्या हत्येची सुपारी तुषार तोडकर याला दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. तुषार तोडकर याने ही सुपारी पिंपरी-चिंचवड येथील सराईत तडीपार गुन्हेगार संतोष मांजरे याला दिली. त्यानंतर संतोष मांजरे याने पवन हुंडारे, पृथ्वी जाधव, विठ्ठल पिकळे आणि योगेश इडोळे यांच्या साथीने हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले. हल्लेखोरांनी विकास नवले समजून त्यांच्या पाणी प्लँटमध्ये काम करणाऱ्या हमजा शेख यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांचा खून केला.
इतर महत्वाच्या बातम्या





















