पुणे: 3 जानेवारीला रात्री दीपक काटेला पुणे विमानतळावर अटक करण्यात आली . पुण्याहून निघालेल्या काटेच्या बँगमध्ये दोन पिस्तुलाची मॅगझिन आणि अठ्ठावीस काडतुसं सापडली होती. एअरपोर्टवरच्या सुरक्षा व्यवस्थेने काटेला पुणे पोलिसांच्या विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चार जानेवारीला त्याला नायलायाच्या समोर हजर केले. मात्र त्यावेळी काटेवर याआधी कोणते गुन्हे नोंद असल्याचं आढळलेलं नाही असं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. आपण कोर्ट ॲप नावाच्या ॲपवर काटेचे नाव टाकून चेक केले असता त्याच्यावर कोणताही गुन्हा आढळला नाही आणि त्यामळे न्यायालयाला तशी माहिती देण्यात आली असं पुणे पोलीस आता सांगत आहेत.
खरं तर त्यावेळी काटेवर 2021 सालचे दोन आणि 2023 सालचे तीन असे एकूण चार गुन्हे त्यावेळी दाखल होते आणि ते न्यायप्रविष्ठ होते. 2010 सालच्या हत्येच्या गुन्ह्यात सत्र न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर काटेने आठ वर्ष तुरुंगवास भोगला होता आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र यातील कोणतीच माहिती न्यायालयासमोर दिली नाही. तपास अधिकाऱ्यांचा दावा आहे की, चार जानेवारीला त्यांनी न्यायधीश यांच्यासमोर एकदा नाही तर तीनवेळा दीपक काटेची पोलीस कोठडी मिळावी यासाठी मागणी केली. मात्र न्यायाधीशांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर 13 जानेवारीला काटेने जामिनासाठी अर्ज दाखल केला आणि 29 जानेवारीला ॲडिशनल सेशन जज किशोर नंदकिशोर शिंदे या न्यायाधीशांनी काटेचा तो जमीन अर्ज मंजूर केला.
काटेवर कोणतेही गुन्हे दाखल नसल्यानं त्याला जमीन द्यायला हवा न्यायाधीश किशोर नंदकुमार शिंदे यांनी म्हटलं होतं,मात्र त्यानंतर सात महिने उलटल्यानंतर पुणे पोलिसांनी याप्रकरणात न तपास केला, न चार्जशीट दाखल केलं. काटेच्या बँगमध्ये सापडलेली पिस्तुलाची मॅगझिन आणि काडतुसे मुंबईतील कलिना इथल्या फॉरेन्सिक लॅबोरेटरीजला पाठवायचं राहून गेल्याने चार्जशीट दाखल केली नाही असं कारण पोलीस आता देत आहेत. मात्र आज किंवा उद्या ती पाठवली जातील असं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे.
दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे यांना न्यायालयीन कोठडी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगरे दोघांना ही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर झाली आहे. पोलिसांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र मागणी नाकारत न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आहे. अक्कलकोट दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. मंगळवारी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली होती. आज पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा आरोपीना न्यायालयात हजर केलं असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोण आहे दीपक काटे? (Who Is Dipak Kate?)
दीपक काटे हा इंदापूरचा रहिवासी आहे. भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत जवळचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील कार्यकर्ता म्हणून त्याला ओळखलं जातं. भारतीय जनता युवा मोर्चाचा सचिव असलेल्या दीपक काटे याला सहा जानेवारी 2025 ला पुणे विमानतळावर अटक करण्यात आली. दीपक काटे पुण्याहुन हैद्राबादला विमानाने जाण्यासाठी पुणे विमानतळावर आला होता. विमानतळावरील सुरक्षा तपासणी दरम्यान यंत्रणेला त्याच्या बॅगमधे एक पिस्तुल आणि 28 काडतुसं आढळून आली. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेने दीपक काटेला पोलीसांच्या हवाली केले आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दीपक काटेचे चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर भाजप नेत्यांसोबत अनेक फोटो आढळून येतात.चार वर्षांपूर्वी दीपक काटेने संभाजी बिडी नाव बदलण्यासाठी पुरंदर किल्ल्यावर आमरण उपोषण छेडले होते. त्यानंतर संभाजी बिडीचे नाव 'साबळे बिडी' असे करण्यात त्याला यश आले. आता संभाजी ब्रिगेड हे छत्रपती संभाजी महाराजांचे एकरी नाव होत आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड नाव बदलावं अशी मागणी दीपक काटे यांची आहे.