पुणे : दिवेआगार विध्यार्थी मृत्यू प्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, तर मृतदेहाची शव विच्छेदन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. प्रत्यक्षदर्शी आणि पंच यांच्या माध्यमातून पोलीस तपास सुरू आहे. सहलीला विद्यार्थ्यांना घेऊन येणारे शिक्षक यांना पोलिसांनी चौकशीसाठी थांबवल्याची प्राथमिक माहिती आहे. तर या प्रकरणी आळंदी नगर परिषदेचे अध्यक्ष, प्रशांत कुऱ्हाडे (Prashant Kurhade), यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(Prashant Kurhade)
आळंदी नगर परिषदेचे अध्यक्ष, प्रशांत कुऱ्हाडे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की, "पहिली गोष्ट निश्चितच ही आळंदीकरांवर नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावरती एक शोककळा पसरलेली आहे. ऐन उमेदीत असलेली ही सर्व तरुण मुलं... विनर्स अकॅडमी, या प्रायव्हेट क्लासने ही जी काल ट्रिप काढली होती दिवेआगरला, त्या ठिकाणी पाण्याचा अंदाज त्या मुलांना न आल्यामुळे आठ जणांचा त्या ठिकाणी काल दुर्दैवी मृत्यू झाला. ती घटना कळल्या-कळल्या नगरपालिकेच्या माध्यमातून आमचे सीओ असतील, स्थानिक पीआय असतील, आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी आमचे नगरसेवक पण सर्व होते, आम्ही सर्वांनी तातडीने माहिती घेतली. तर आठ जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता. नंतर आम्ही त्या क्लासचा पण संबंधित जे शिक्षक आहेत, त्यांच्याशी पण आम्ही कॉन्टॅक्ट काल केलं होतं, तर त्यांनी पण त्या ठिकाणी सांगितलं की आठ जणांचा मृत्यू झालेला आहे.(Prashant Kurhade)
पुढे प्रशांत कुऱ्हाडे म्हणाले की, निश्चितच येणाऱ्या काळामध्ये, आणि मी सर्व राज्यातील पालकांना खास करून विनंती करेन की ज्यावेळेस अशा प्रायव्हेट क्लासच्या किंवा शाळांच्या ट्रिप निघतील, तर ती योग्य ठिकाणी जातेय का, योग्य ठिकाणी त्यांचा बंदोबस्त होतोय का, ही सर्वांनी आवर्जून काळजी घेतली पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना पण आवाहन करतो की असा कोणत्याही प्रकारचा स्टंट आपण न करता, आपण आपल्या परिवाराचा देखील त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. अतिशय वाईट घटना झालेली आहे. त्या कुटुंबाचा आक्रोश पाहता आम्हाला देखील फार वाईट वाटलेलं आहे. आणि या घटनेचा एक शोककळा आळंदीवरती पसरली, त्यामुळे आळंदीकरांनी उत्स्फूर्तपणे संपूर्ण आळंदीचा व्यवहार या ठिकाणी आज बंद केलेला आहे."(Prashant Kurhade)
"हा क्लास सुरू होता, आपल्या हद्दीत होता, या क्लासला आपण परवानगी दिली होती का? इमारत अधिकृत आहे का? याचा काही आढावा घेतलाय का? यावरती उत्तर देताना प्रशांत कुऱ्हाडे म्हणाले, "आत्ताच मी सीओसाहेबांशी चर्चा केली त्यासंदर्भात. आता अजून एक दोन मयती त्या ठिकाणी होणार आहेत. ते झाल्यानंतर आम्ही तात्काळ सर्व विभागांना त्या ठिकाणी सूचना देऊन, तातडीने त्याच्यावरती सगळी पाहणी करून, जर चुकीचं असेल तर लगेच त्या ठिकाणी तात्काळ कारवाई करणार आहे आणि विशेष म्हणजे सरांना मी आत्ता हेही बोललो की आळंदीतल्या सर्व क्लास, प्रायव्हेट, सर्व शाळा असतील, सर्वांचे परवाने आहेत का, कायद्याच्या चौकटीत ते नियमांचं उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावरती देखील कठोर कारवाई करणार आहे."
सगळ्या घटना घडल्यानंतर आपण ह्या सगळ्या उपाययोजना करतो. याअगोदर प्रशासनाची ही जबाबदारी होती की घटना रोखण्यासाठी असे क्लास येत आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, परवानगी देताना याचं मूल्यमापन होत नाही का?" यावरती प्रशांत कुऱ्हाडे म्हणाले, "निश्चितच, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. त्याकरताच आता आम्ही तातडीने सर्व आळंदीतल्या यांना नोटीस पाठवणार आहेत. आणि जे काही शासनाचे नियम आहेत, त्या नियमांमध्ये हे सर्व आहेत का, हे सर्व पाहणार आहे. जे कोण नियमात नसेल, त्यांचा तात्काळ... जर बिल्डिंगला पण परमिशन नसेल तर त्या ठिकाणी ती सील करून टाकणार आहे."
"यासोबतच वारकरी शिक्षण संस्थांचाही प्रश्न आहे, आपण मागच्या काळातल्या घटना पाहिल्या. तर यासोबत त्याही तपासल्या जाणार का?" यावरती प्रशांत कुऱ्हाडे म्हणाले "त्या ऑलरेडी सगळ्या तपासलेल्या आहेत. ज्या ज्या अनधिकृत आहेत, त्यांना आपण ऑलरेडी बंद केलेलं आहे. आपण जवळजवळ १० ते १२ संस्था बंद केलेल्या आहेत. मागच्या वेळी जे प्रकार घडले होते, त्यावेळेस आपण १० संस्था बंद केलेल्या आहेत."
"निश्चितच, आत्ताच म्हणजे कालपासून आम्ही पूर्ण गोंधळात होतो की नक्की किती जण गेलेत काय, आम्हाला कन्फर्म माहित नव्हतं. पण आज सकाळी आम्हाला पूर्ण माहिती मिळालेली आहे. त्यातले काही विद्यार्थ्यांची परिस्थिती खूप गरीब आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती गरीब आहे आणि बाकीच्यांना पण, सगळ्यांना मी सीएम साहेबांना असेल, पालक मंत्र्यांना असेल, आमचे स्थानिक आमदार असतील, महेशदादा लांडगे असतील, या सर्वांना विनंती करून त्या ठिकाणी सर्वांना कुटुंबांना काही ना काही मदत मिळावी, अशी त्या ठिकाणी मी मागणी करणार आहे आणि जे काही असे क्लासेस आहेत, खरं पाहिलं तर ही घटना चुकीची झालेली आहे. आणि असे जे अनधिकृत क्लासेस चालू आहेत आळंदीमध्ये असतील, त्यांच्यावरती आता ही घटना घडल्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आम्ही आता लगेच बोलू शकत नाही. परंतु ही घटना घडली याच्यातून ते सावरल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि सर्व क्लासच्या त्या शिक्षकांना बोलवून जे चुकीच्या पद्धतीने, त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.
