Pooja Khedkar: वादग्रस्त पूजा खेडकरला यूपीएससीने मोठा धक्का दिला आहे. यूपीएससीने पूजा खेडकरची (IAS Officer Pooja Khedkar) उमेदवारी रद्द केली आहे. भविष्यात सर्व परीक्षा आणि निवडीमधून तिला काढून टाकलं आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तर तिला अंपगत्वाचे प्रमाणापत्र दिल्याप्रकरणी पिंपरीतील वायसीएम रूग्णालयाचे डॉक्टर अडचणीत सापडल्याचं दिसून येत आहे. वायसीएम रुग्णालयाने IAS पूजा खेडकरला (IAS Officer Pooja Khedkar) दिलेलं सात टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र खरं असल्याचा दावा डॉक्टर राजेश वाबळे यांनी केला आहे. मात्र खेडकरने MRI रिपोर्ट फक्त दाखवला पण तो कागदपत्रांसह जोडला नाही याची कबुली देखील डॉ वाबळेंनी दिली आहे.
वायसीएम रुग्णालयाने आयएएस पूजा खेडकरला (IAS Officer Pooja Khedkar) दिलेलं सात टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र खरं असल्याचा दावा डॉक्टर राजेश वाबळेंनी केला आहे. मात्र खेडकरने MRI रिपोर्ट फक्त दाखवला. पण तो कागदपत्रांसह जोडला नाही. याची कबुली डॉ. वाबळेंनी दिली आहे. त्याचवेळी तपासण्या झाल्यानंतर सर्व कागदपत्रे दिव्यांग विभागात रुग्णाने जमा करण्याची परंपरा पूर्वीपासून आहे असं म्हणत वायसीएम रुग्णालयाने हात झटकले आहेत.
पूजा खेडकरने (IAS Officer Pooja Khedkar) MRI रिपोर्ट न देता अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविल्याचे एबीपी माझाने समोर आणले होते. असं असताना ही ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपी विभागाने चोखपणे आणि निष्पक्षपणे बजवल्याचं चौकशी अहवालात नमूद आहे. त्यामुळं या चौकशीवर ही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या सूचनेनुसार पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने हे चौकशीचे आदेश दिले होते.
पूजा खेडकरची निवड यूपीएससीकडून रद्द
यूपीएससीने पूजा खेडकरची (IAS Officer Pooja Khedkar) उमेदवारी रद्द केली आहे. तसेच यूपीएससीने पूजा खेडकरला भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीमधून काढून टाकले आहे. खेडकरनी नियमांचं उल्लंघनं केल्याचं आणि त्यामध्ये त्या दोषी आढळल्यामुळं ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पूजा खेडकरला यूपीएससीकडून दोषी करार देण्यात आला आहे.
पूजा खेडकर दोषी आढळल्यानंतर नागरी सेवा परीक्षा नियम 2022 नुसार दोषीकरार अंतर्गत तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पूजा खेडकरची (IAS Officer Pooja Khedkar) आयएएसपदाची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. आज पूजा खेडकरच्यावतीने कोर्टात हा बचावाचा मुद्दा मांडण्यात आला होता. त्यात अजून यूपीएससीने दोषी ठरवलेले नाही. यूपीएससीने आज दुपारपर्यंत म्हणणं मांडायला पूजा खेडकरला वेळ दिला होता.