Pune ACB Trap: पुण्यात लाचलुचपत विभागाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षकाला रंगेहात पकडले आहे. 50 हजार रकमेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रार केलेल्या अर्जात मदत करतो आणि अडकलेले पैसे काढून देतो, असं सांगून 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. सागर पोमण असं या 35 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. पोलीसांकडूनच अशा प्रकारच्या लाचेची मागणी झाल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराचे आर्थिक व्यवहारात पैसे अडकले होते. त्यामुळे तक्रारदार त्रस्त होता. त्याचाच फायदा घेत आर्थिक व्यवहारांमध्ये अडकलेले पैसे परत मिळवून देतो सांगत लाचेची मागणी केली होती. तक्रारदार हे व्यवसायिक आहेत. त्यांचे 20 लाख मिळवून देण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराने लगेच लाचलुचपत विभागा तक्रार केली त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर लाचलुचपच विभागाने कारवाईला सुरुवात केली.
कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमध्ये आणून देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे तक्रारदाराने 50 हजार पोलीस उपनिरिक्षकाला आणून दिले आणि त्यांनी स्वीकारले. लाचलुचपत विभागाने सापळा रचला. साध्या वेशात जात लाचलुचपत विभागातील अधिकाऱ्यांनी पोलीस निरिक्षकाला रंगेहात पकडले.
1 कोटी रुपयांची अपसंपदा जमवल्याप्रकरणी पुण्यातील मनपा उपायुक्तांवर गुन्हा दाखल
पुणे महापालिकेतील उपायुक्त विजय लांडगे आणि त्यांची पत्नी शुभेच्छा लांडगे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गैरमार्गाने मालमत्ता कमावल्याबद्दल अटक केली होती. तब्बल 1 कोटी रुपयांची अवैध अपसंपदा जमवल्याप्रकरणी त्यांंच्यावर कारवाई करण्यात आली होती. ज्ञात उत्पन्नापेक्षा लांडगे पती- पत्नींकडे 31.59 टक्के जास्त मालमत्ता आढळून आली होती. विजय लांडगे हे पुणे महापालिकेतील आकाशचिन्ह विभागात उपायुक्त होते. या पदाचा दुरुपयोग करून त्यांनी ही बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच म्हणणं होतं. लांडगेंकडे एक कोटी दोन लाख साठ हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली होती. मोठा अधिकारी गाळाला लागल्याने खळबळ उडाली होती.