PM Narendra Modi Pagadi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या (14जून) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते देहूमधील (Dehu) शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मोदींसाठी पुण्याचे मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून खास डिझायनर पगडी तयार करण्यात आली होती. या पगडीवर वारकऱ्यांची छाप होती. त्यावर अभंगाच्या ओळीसुद्धा लिहिण्यात आल्या होत्या. मात्र या पगडीवर लिहिण्यात आलेल्या ओळींमुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे मोदी पुण्यात प्रवेश करण्याआधीच त्यांच्या दौऱ्याला ग्रहण लागल्याचं चित्र आहे
आधी तयार करण्यात आलेल्या या पगडीवर 'भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी' या अभंगाच्या ओळी होत्या. परंतु, यावर काहींनी आक्षेप घेतल्यानंतर आता देहू संस्थानाने ओवी बदलल्या आहेत. आता या पगडीवर 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ' अशा अभंगाच्या ओळी टाकण्यात आल्या आहेत.
यापुर्वी देखील मेट्रोच्या उद्धाटानाच्यावेळी पंतप्रधान मोदींच्या फेट्यावरुन वाद निर्माण झाला होता. शिवमुद्रा मोदीच्या फेट्यावर लावण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर फेट्यावरुन शिवमुद्रा काढून टाकण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या देहूमध्ये येणार आहेत. संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे अन् शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यासाठी देहू संस्थानने मार्च महिन्यात मोदींना दिल्लीत जाऊन आमंत्रण दिलं होतं. ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं असून मोदींनी येत्या 14 जूनची वेळ दिली आहे, अशी माहिती देहू संस्थानने दिली आहे. इतिहासात पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहू इथे येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या देहूतील संत तुकाराम महाराजांचे मंदिर (Saint Tukaram Maharaj) आता तीन दिवस नव्हे तर एकच दिवस दर्शनासाठी बंद राहणार आहे. समाज माध्यमांवर उमटलेल्या प्रतिक्रियांमुळे आधीच्या निर्णयात हा बदल करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (14जुन) देहू दौऱ्यावर आहे. या दोऱ्यासाठी देहूत मोठी तयारी सुरु आहे.मोदींच्य़ा आगमनासाठी देहू नगरी सजली आहे. मोदींच्या हस्ते शिळा मंदिराचं लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. सभामंडपाची तयारी शेवटच्या टप्प्यात सुरु आहे. मोदींच्या कार्यक्रमासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.