पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या(गुरूवारी) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुणे शहरातील पहिला भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. उद्या (गुरूवारी) रात्री ८.३० नंतर पुणेकरांना शहरातील पहिला भूमिगत मेट्रोचा मार्ग अनुभवता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रमानंतर हा मार्ग खुला करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हे 3.62 किलोमीटरचे अंतर आहे. मात्र, दुपारच्या वेळेत जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन नागरिकांसाठी बंद राहणार आहे. (PM Modi To Inaugurate Pune Metro)

सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट १० मिनिटांत स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट मेट्रो)

* स्वारगेट, मंडई आणि कसबा पेठ तीन स्थानके

* अंतर ३.३४ किलोमीटर

* सर्व भूमिगत स्थानकांची कामे पूर्ण

* प्रवासी सोयीसुविधा आणि सुरक्षाविषयक कामे पूर्ण

* स्वारगेट स्थानक येथील पीपीपी तत्त्वावरील मल्टिमोडल हब या इमारतीचे काम अजून बाकी

* सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट असा प्रवास केवळ १० मिनिटांत

* स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट स्थानकांमधील अंतर

* सिव्हिल कोर्ट ते कसबा मेट्रो स्थानक अंतर : ८५३ मीटर

* कसबा पेठ ते मंडई मेट्रो स्थानक अंतर : १ किमी

* मंडई ते स्वारगेट मेट्रो स्थानक अंतर : १.४८ किमी

* सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो स्थानक एकूण अंतर : ३.३४ किमी

कात्रज ते निगडीपर्यंत प्रवास होणार शक्य (स्वारगेट ते कात्रज मेट्रो)

* स्वारगेट-कात्रज भूमिगत मार्गिका असणार

* ५.४६ किमीची विस्तारित मार्गिका असेल

* तीन भूमिगत स्थानकांचा समावेश असेल

* मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजीनगर आणि कात्रज ही स्थानके

* २९५४.५३ कोटीपर्यंत खर्च येणार

* फेब्रुवारी २०२९ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य

* मार्केट यार्ड, बिबवेवाडी आणि कात्रज उपनगरांना जोडणार

* मेट्रोने थेट कात्रज ते निगडीपर्यंत प्रवास शक्य

* निविदा प्रक्रिया लवकरच

* दोन ते तीन महिन्यांनंतर

* प्रत्यक्ष कामाला सुरुवात

* भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन, द्विपक्षीय एजन्सी इत्यादींचे समानरीतीने सामाईक योगदान

भूमिगत स्थानकांमध्ये या सुविधा मिळणार

* सरकते जिने, लिफ्टची सुविधा

* सीसीटीव्ही

* माहितीदर्शक एलईडी स्क्रीन

* सुरक्षेसाठी प्लॅटफॉर्मवर सेफ्टी डोअर

* एसी (वातानुकूलित यंत्रणा)

* फायर यंत्रणा

* साधे जिने

* ऑनलाइन, ऑफलाइन तिकीट काउंटर सुविधा