पुणे: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे, गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग (Pune Metro) आजपासून प्रवाशांसाठी सुरू झाला आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मेट्रो मार्गाचं पंतप्रदान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे. ऑनलाईन पध्दतीन नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी या मेट्रोला (Pune Metro) हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) हे पुण्यात उपस्थित आहेत, या मेट्रोमधून (Pune Metro) आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपस्थित नेते महिला आणि लहान मुले पहिल्यांदा प्रवास करणार आहेत, त्यांनतर आज दुपारी ४ वाजल्यानंतर हा मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचे लोकार्पण झाले आहे. आज संध्याकाळी ४ वाजता हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग (Pune Metro) आहे. या मार्गावर जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई, स्वारगेट अशी 4 मेट्रो स्थानके आहेत. 


कसं असणार या मार्गावरचं तिकीट दर?


जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ: 10 रुपये


जिल्हा न्यायालय ते मंडई: 15 रुपये


जिल्हा न्यायालय ते स्वारगेट: 15 रुपये


स्वारगेट ते मंडई: 10 रुपये


स्वारगेट ते कसबा पेठ: 15 रुपये


स्वारगेट ते जिल्हा न्यायालय: 15 रुपये


आणखी या विकासकामांचं मोदींच्या हस्ते झालं लोकार्पण आणि उद्घाटन 


- स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन


- सोलापूर विमानतळाचे उद्घाटन


- भिडे वाडा येथील स्मारकाचे भूमिपूजन


- राज्यातील बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला समर्पित


मागचा दौरा पावसामुळे झाला होता रद्द


26 सप्टेंबर रोजी निश्चित झालेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Modi) पुणे दौरा पावसामुळे रद्द झाला होता. आज पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थितीत पाहून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक (Pune Metro) या मार्गाचे लोकार्पण केला आहे. या कार्यक्रमासाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थितीत आहेत.(Pune Metro inaugurate)