एक्स्प्लोर

Pimpri-Chinchwad News: पिंपरी चिंचवडमधील 'ते' 29 बंगले 31 मे पूर्वी जमीनदोस्त होणार! सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, नेमकं काय प्रकरण?

Pimpri-Chinchwad News: 29 बेकायदा बंगले आणि इतर बांधकामे पाडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं. न्यायमूर्ती अभय एस. ओका आणि उजल भूयन यांनी येथील रहिवाशांचा अपील अर्ज फेटाळून लावला आहे.

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेल्या 29 बेकादेशीर बंगले आणि इतर बांधकामे पाडण्यावर रहिवाश्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेला अपील अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे हरित लवादाने दिलेला निर्णय कायम ठेवत, 31 मे पूर्वी ही नदीपात्रातील बांधकामे पाडून नदीचे मूळ क्षेत्र पुन्हा मूळ स्थितीत आणण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असून दोन दिवसांची मुदत येथील रहिवाश्यांना देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

चिखली येथील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेले 29 बेकायदा बंगले आणि इतर बांधकामे पाडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं. न्यायमूर्ती अभय एस. ओका आणि उजल भूयन यांनी येथील रहिवाशांचा अपील अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे हरित लवादाने दिलेला निर्णय कायम राहिला असून, जिल्हाधिकारी आणि महापालिकेला ही अनधिकृत बांधकामे दि. 31 मे पर्यंत जमीनदोस्त करावी लागणार आहेत. चिखलीतील सर्व्हे नंबर 90 मध्ये बंगलो प्लॉट बांधकाम प्रकल्प करण्यात आला होता. हे प्लॉटिंग मे. जरे वर्ल्ड आणि इतरांचं आहे. महापालिका हद्दीत इंद्रायणी नदीपात्रातील निळ्या पूररेषेच्या प्रतिबंधित क्षेत्रात ही बांधकामे करण्यात येत होती. या बांधकामामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आणून पर्यावरण संरक्षण आणि सुधारणा कायद्यांचे उल्लंघन केले जात होते. संबंधित विकासकांनी पर्यावरण अधिनियमातील तरतुदींचं उल्लंघन केलं.

इंद्रायणी पूररेषेतील हे बंगले पाडण्याचे हरित लवादाने आदेश दिले होते. मात्र, संबंधित रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतल्याने बांधकामे पाडण्याची कारवाई थांबली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने ही बांधकामे पडण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, पावसाळ्यात ही बांधकामे पाडता येणार नाहीत. महापालिकेला ही बांधकामे आता 31 मेपूर्वीच पाडावी लागणार आहेत. हरित लवादाने हे बांधकामे पाडण्याचे आदेश दिलेले होते. त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या रहिवाशांची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने हे क्षेत्र पुन्हा मूळ स्थितीत आणण्याचा आदेश दिला आहे. संबंधितांना पर्यावरण नुकसानभरपाईसाठी पाच कोटींचा दंडही ठोठावला आहे. त्यानंतर या रहिवाशांनी मुदत मागत फेर अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो ही फेटाळला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असून दोन दिवसांची मुदत येथील रहिवाश्यांना देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
Nashik News: लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
Winter Session: अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी
अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
Nashik News: लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
Winter Session: अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी
अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
Maharashtra Flood Aid: शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
Weather Update: नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
Ind vs SA 2nd T20 Team India Playing XI: संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT...द. अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT...द. अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
Sahyadri Hospital Vandalised : पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल; रूग्णालयाने दिलं घटनेबाबत स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल; रूग्णालयाने दिलं घटनेबाबत स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?
Embed widget