Pimpri-Chinchwad Election 2026: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीआधी (Pimpri-Chinchwad Election 2026) राजकीय समीकरणांमध्ये मोठा उलथापालथ झाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) थेट अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती जाहीर केल्याने महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, “पिंपरीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मविआला धोका दिला,” असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Continues below advertisement

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून पवार साहेबांना गृहीत धरले होते. आमच्या गेल्या तीन-चार महिन्यात अनेक बैठका झाल्यात. आम्ही एकत्रित येऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लढवणार हे देखील ठरले होते. पण, अचानक हा निर्णय म्हणजे महाविकास आघाडीला धक्काच आहे. 

Pimpri-Chinchwad Election 2026: जागावाटपावरही चर्चा झाली होती; तरीही युती तोडली

गौतम चाबुकस्वार पुढे म्हणाले की, “महाविकास आघाडी महाराष्ट्रात जशी आहे, तशीच पिंपरी-चिंचवडमध्येही असावी, ही आमची ठाम भूमिका होती. त्यानुसार जागावाटपावरही चर्चा झाली होती. मात्र दुर्दैवाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या , असे त्यांनी म्हटले.

Continues below advertisement

Pimpri-Chinchwad Election 2026: ‘आमची फसवणूक झाली’ 

शरद पवार गटाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना चाबुकस्वार म्हणाले, “आमची फसवणूक झाली आहे. शेवटपर्यंत आमच्याशी चर्चा केली अन् अजित पवारांशी घरोबा करत आमची फसवणूक केली, आरोप आरोप त्यांनी केलाय. तर या राजकीय धक्क्यानंतर ठाकरे गटाने आता पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. “मविआचा प्लॅन A फोल ठरला आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाला वगळून प्लॅन B तयार केला जात आहे,” अशी माहितीही गौतम चाबुकस्वार यांनी दिली आहे.

Pimpri-Chinchwad Election 2026: पिंपरी चिंचवडमध्ये भाजप-शिवसेना युतीची घोषणा रखडली 

दरम्यान, अर्ज भरायला काही तास उरलेत, तरी अद्याप ही पिंपरी चिंचवडमध्ये भाजप-शिंदे शिवसेना युतीची घोषणा झालेली नाही. असं असलं तरी दुसरीकडे भाजपचे 128 जागांचे सर्व एबी फॉर्म प्रदेश कार्यलयातून पोहचलेले आहेत. भाजपने याला दुजोरा ही दिलाय. शिंदे शिवसेनेसोबत जागांमध्ये रस्सीखेच सुरुये, हे पाहता युती तुटली तर भाजप आणि आठवलेंची आरपीआय एकत्र लढणार आहेत. आरपीआयच्या उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढणार हे आधीचं ठरलेलं आहे. त्यामुळं शिंदे शिवसेनेनं अधिक घासाघीस केली तर भाजपने सर्व जागांचे एबी फॉर्म तयार ठेवलेत अन् 128 जागांवर ते लढणार असं शिवसेनेला सूचित ही केलं.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Pune Election 2026 NCP : मोठी बातमी! पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, अजितदादांना 125, शरद पवार गट 40 जागा लढवणार, मध्यरात्रीच्या बैठकीत शिक्कामोर्तब