Pune Crime News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय; नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पत्नीनं पतीचा ओढणीनं गळा घोटला, मध्यरात्री पुण्यात नेमकं काय घडलं?
Pune Crime News: काल सायंकाळी देखील दोघांत वाद झाला होता, रात्री देखील नकुलचा आणि पत्नीचा वाद झाला त्या वादात नकुलच्या पत्नीने ओढणीनं गळा दाबून हत्या केली.

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरात पत्नीने पतीचा खून (Pune Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. पती सामाजिक कार्यकर्ता होता तर पत्नी आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहे. नकुल भोईर असं खून झालेल्या सामजिक कार्यकर्त्याच नाव आहे. नकुल भोईर हा पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार (Pune Crime News) संशय घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. काल सायंकाळी देखील दोघांत वाद झाला होता, रात्री देखील नकुलचा आणि पत्नीचा वाद झाला त्या वादात नकुलच्या पत्नीने ओढणीनं गळा दाबून हत्या केली. आरोपी पत्नीला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Pune Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कौटुंबिक वादातून एका सामाजिक कार्यकर्त्याचा त्याच्या पत्नीनेच निर्घृण खून केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू आहे.
Pune Crime News: नेमकं काय आहे प्रकरण?
खून झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव नकुल भाईर असं आहे. त्यांचा पिंपरी चिंचवड भागात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. नकुल भोईर हे शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी आणि विविध सामाजिक चळवळीत सक्रिय होते. चिंचवडगाव आणि शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी आग्रही असायचे. अशा सामाजिक कार्यकर्त्याचा मध्यरात्री अचानक खून झाल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास चिंचवड परिसरातील त्यांच्या राहत्या घरी घडली आहे. नकुल भाईर यांचा खून त्यांच्या पत्नीनेत केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. विशेष म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीत आपल्या पत्नीने नगरसेवक पदाची निवडणूक लढवावी, यासाठी पती पत्नी दोघांनी मोठी तयारी केली होती. नगरसेवक बनण्याचं स्वप्न होतं, त्या पत्नीने नकुल यांची हत्या केली आहे.
Pune Crime News: रागाच्या भरात पत्नी चैतालीने ओढणीने
प्राथमिक तपासानुसार, नकुल भाईर आणि त्यांची पत्नी चैताली भाईर यांच्यामध्ये वारंवार वाद सुरू होते. रात्री उशिरा नकुल आणि त्यांची पत्नी यांच्यात पुन्हा वाद झाले आणि रागाच्या भरात पत्नी चैतालीने ओढणीने गळा आवळून नकुलचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सध्या चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी चैताली भाईरला तत्काळ ताब्यात घेतले असून, तिची कसून चौकशी सुरू आहे. नेमका वाद कोणत्या कारणावरून विकोपाला गेला, याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत.
Pune Crime News: भोईर हा पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नकुल भोईर हा पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले. परंतु, शुक्रवारी पहाटे झालेल्या वादातून ही घटना घडली आहे. नकुल आणि चैताली यांच्यात वाद झाले. यातूनच प्रकृतीने भारदस्त असलेल्या चैतालीने ओढणीनं गळा दाबून हत्या केली. दोन आणि पाच वर्षांची मुलं आतील रूममध्ये झोपली होती. तेव्हा हा सर्व थरार बाहेरच्या रूममध्ये सुरू होता. नकुल आणि चैताली यांचा साडी सेंटरचा व्यवसाय होता. असं असताना नेहमीच्या वादातून आणि सतत चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीने पतीची हत्या केली आहे. घटनेचा अधिक तपास चिंचवड पोलीस घेत आहेत.



















