पुणे : पिंपरी- चिंचवडमधून धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime news)  आला आहे.  तीन वर्षीय चिमुरड्याला इतर अल्पवयीन मुलांनी विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अग्निशमन दल, चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चिमुरड्याला विहिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. वसीम नाज्जीमुद्दीन खान असं तीन वर्षीय चिमुरड्याचं नाव आहे.


या घटनेत चिमुरड्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी व्यक्त केला आहे. वसीम नज्जीमुद्दीन खान अस तीन वर्षीय चिमुरड्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास खेळत असताना मुलांनी लहानग्या वसीमला ढकलून दिल्याच सांगण्यात येत आहे. एकवीस तास उलटू गेले तरी अद्याप मुलाला बाहेर काढण्याचा शर्थीचे प्रयत्न अग्निशमनदल करत आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षीय चिमुरड्याला इतर अल्पवयीन मुलांनी विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साधारण सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. वसीम आणि त्याचे काही मित्र घराजवळील विहिरीजवळ ही मुलं खेळत होती. खेळत असताना काही मुलांनी वसीमला थेट विहिरीत ढकलून दिलं. तीन वर्षाचा मुलगा थेट विहिरीत पडला. हे पाहून इतर मुलं घाबरले. त्यांनी थेट वसीमच्या कुटुंबियांना माहिती दिली. हा प्रकार ऐकून कुटुंब घाबरलं आणि त्यांनी यासंदर्भात पोलिसांना दिली. पोलिसांनी एका क्षणात सूत्र हवलली आणि घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलालादेखील यासंदर्भातली माहिती दिली. अग्निशमनदल मुलाचा शोध घेत आहे. 


हसतं खेळतं मुलं गेलंच !


वसीम नाज्जीमुद्दीन खान असं तीन वर्षीय चिमुरड्याचं नाव आहे. रोज प्रमाणे खेळायला गेला आणि खेळून घरी येई, अशी कुटुंबियांना अपेक्षित होतं. मात्र वसीमला मित्रांनी ढकलून दिलं आणि सगळ्याच अपेक्षांवर पाणी फेरलं. घरात लहान मुल असलं की घर हसत खेळत राहतं. मात्र त्याच लहान मुलासोबत असं काही घडल्यास संपूर्ण कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकतो. पोलिसांनी वसीमचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे कालपर्यंत हसतं खेळतं असलेल्या खान कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.


इतर महत्वाची बातमी-


Pune Crime News : तरुण कोयता घेऊन तरुणीच्या मागे धावला, नागरिकांनी आरडाओरड केली अन् मोठा अर्थ टळला; पुण्यात नेमकं काय घडलं?


Pune Bullet News : पुण्यातील रस्त्यावर बुलेटच्या सायलेन्सरचा 'भोंगा'; 3 दिवसात 619 "बुलेट राजांवर" कारवाई