Pawna Dam Maval : मावळ (Maval) येथील पवना धरणात (Pawna Dam) बुडून एका 27 वर्षीय अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. मयांक उपाध्याय असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. मयांक हा मित्रांसमवेत पवना धरणात पोहण्यासाठी गेला होता.पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. इतर मित्रांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत त्याचा बुडून मृत्यू झाला होता. मयांक हा हिंजवडीत खासगी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होता.
नागपुरमध्ये महिलेने रॅश ड्राईव्हिंग करत दोघांना उडवले
दरम्यान, नागपुरात महिलेच्या रॅश ड्राईव्हिंगने एकाचा मृत्यू झालाय तर एकजण गंभीररित्या जखमी झाला आहे. नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राम झुल्यावर मध्यरात्री ही घटना घडली. एक महिलेने रॅश ड्राईव्ह करत दोन दुचाकीस्वार असलेल्या दोघांना उडवले . त्यात मोहमद हुसेन यांचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. काळ्या रंगाच्या मर्सिडिजमध्ये माधुरी सारडा व रितिका मालू होत्या. अत्यंत वेगाने जात असतांना हा अपघात घडला. या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात हिट अँड रन अंतर्गत गुन्हा दाखल केला.
इतर महत्वाच्या बातम्या