पुणे : पुणे तिथे काय उणे हे आपण कायम ऐकतो. पुणेकर कधी काय करतील याचाही काही नेम नाही. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पुण्याची नेहमीच चर्चा होत असते. , पुणेकरांचं तिरकसं बोलणं आणि पुणेकरांचा मदत करण्याचा स्वभाव या कोणत्या ना कोणत्या कारणाने पुणे नेहमीच चर्चेत असते. आज पुण्यात पोपट वारंवार शिट्टी मारत असल्याने पोपटाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात पोपट वारंवार शिट्टी मारत असल्याने पोपटाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोपटाचा त्रास होत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली. या तक्रारीनंतर पुण्याच्या खडकी पोलीस ठाण्यात पोपटाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अकबर अमजद खान असं गुन्हा दाखल झालेल्या पोपटाच्या मालकाचं नाव आहे.
सुरेश अंकुश शिंदे (वय 72) यांनी या बद्दल पोलिसात तक्रार दिली आहे. अकबर अमजद खान यांच्यावर पुण्यातील खडकी पोलिस ठाण्यात भादवि. 504, 506 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे आणि खान हे दोघे ही हे महात्मा गांधी वसाहत, तुळशी मार्केट शेजारी, शिवाजीनगर, शेजारी राहायला आहेत. अकबर अमजद खान यांनी एक पोपट पाळला आहे. हा पोपट वारंवार शिट्या मारत होता.
ही घटना 5 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता घडली आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या शेजारी राहत असलेल्यांना तुमचा पोपट सारखा ओरडत असतो. तुमच्या पोपटामुळे आम्हाला त्रास होतो, तुम्ही तो दुसरीकडे कुठेतरी ठेवा असे सांगितले. या कारणावरून पोपट मालकांनी शिंदे यांना शिवीगाळ करून तक्रारदार यांना मारण्याची धमकी दिली. यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला. आता आपल्या पोपटामुळे प्रकरण थेट पोलिसात गेल्याने मालक धास्तावले. त्यानंतर मालकाने पिंजऱ्यात बंद केलेल्या पोपटाला सोडून दिले.
संबंधित बातम्या :