पुणे : संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे उद्या सराटी या ठिकाणी नीरा नदीमध्ये स्नान होणार आहे. परंतु नीरा नदी संपूर्णपणे कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे तुकोबांच्या पादुकांना सराटी येथी टँकरच्या पाण्याने 'नीरा स्नान' घातले जाणार असल्याची माहिती इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली आहे.
सराटी या ठिकाणी होत असलेल्या नीरा स्नानाला फार मोठे महत्त्व आहे. पूर्वी या ठिकाणी तुकोबांची पालखी आल्यावर नदी ओलांडण्यास पूल नव्हता तेव्हा कोळीबांधव पालखी होडीतून पलीकडे नेत असत. काही काळानंतर येथे पूल बांधण्यात आला. त्यानंतर पालखी पुलावरुन नेली जाऊ लागली. त्यामुळे कोळीबांधवाचा सन्मान म्हणून दरवर्षी येथे नीरा स्नान घातले जाते.
परंतु यंदा या ठिकाणी पाऊस न पडल्याने नीरा नदीला पाणी नाही. नदी कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे तुकोबांच्या पादुकांना टँकरने आणलेल्या पाण्याने स्नान घालण्याची वेळ आली आहे.
नीरा नदी कोरडीठाक, तुकाबारायांच्या पादुकांना टँकरच्या पाण्याने स्नान घालणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Jul 2019 05:32 PM (IST)
संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे उद्या सराटी या ठिकाणी नीरा नदीमध्ये स्नान होणार आहे. परंतु नीरा नदी संपूर्णपणे कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे तुकोबांच्या पादुकांना सराटी येथी टँकरच्या पाण्याने 'नीरा स्नान' घातले जाणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -