पुणे: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील रहिवासी कौस्तुभ गणबोटे (Kaustubh Ganbote) आणि संतोष जगदाळे या दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी कौस्तुभ गणबोटे (Kaustubh Ganbote) यांच्या पत्नी संगीता गणबोटे देखील त्यांच्यासोबत फिरण्यासाठी गेलेल्या होत्या. संगीता गणबोटे यांनी एबीपी माझाशी बोलताना त्या ठिकाणी घडलेला थरार सांगितला आहे, एबीपी माझाशी बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही पहेलगाम मध्ये पोहचलो. त्या ठिकाणी आम्ही घोडेवाला ठरवला. फोटो काढत तिथले ड्रेस घालून देखील आम्ही खूप फोटो काढले. त्या फोटोग्राफरला आम्ही 5000 रुपये दिले होते. आम्ही फोटोसाठी दिले होते फोटो काढत असतानाच दोन-तीन वेळा गोळीबाराचा आवाज झाला.
वाघ आला असेल. तो कधी कधी येतो
गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर तिथली लोक म्हणाले, वाघ आला असेल. तो कधी कधी येतो. त्यामुळे गोळीबार करतात. त्यामुळे तो पळून जातो. सगळे तिथे म्हणाले की, खाली पालथा झोपा. तो तिकडच्या तिकडे निघून जाईल. आम्ही खाली झोपलो. तर पुन्हा आवाज झाले. त्या आवाजावेळीच हल्लेखोर आमच्यापर्यंत येऊन पोहोचले. हल्लेखोरांनी जगदाळे यांना नमाज पडता येतो का? असं विचारलं. ते म्हणाले हो. माझे मुसलमान मित्र आहेत. मी सगळं बोलतो. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी "अल्लाह-हू-अकबर" म्हणायला सुरुवात केली. आम्ही म्हटलं आम्हाला मारू नका. जगदाळे त्यांच्याशी बोलत होते. त्यावेळी ते हिंमत करून पुढे गेले आणि म्हणाले आम्हाला मारू नका. आम्ही काही केलं नाहीये. आम्ही तुम्ही काय म्हणाल ते करू. तरी त्यांना गोळ्या घातल्या. डोळ्यात गोळी लागली. त्यामुळे ते खाली पडले. माझ्या मिस्टरांना काहीच बोलले नाहीत. सरळ तोंडावर गोळा झाडल्या. ते जागच्या जागीच गेले. तिथे एकाही ठिकाणी सैन्य नव्हत, सुरक्षा नव्हती, सुरक्षारक्षक नव्हता. तिथे एक तरी सुरक्षारक्षक का नाही ठेवला त्यांनी एक जरी माणूस असता तरी लोक वाचले असते. सुरक्षारक्षक असते तर तिथे अतिरेकी कशाला आले असते, वरती ते नसते आले, त्यांना गोळ्या घातल्या त्यावेळी त्याच परिस्थितीत मी हिंमत करून त्यांच्या खिशातून फोन काढला,असं संगीता गणबोटे यांनी सांगितलं, तर सुरक्षारक्षक त्या ठिकाणी असायला हवे होते, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळी तिथे स्थानिक लोक
तिथे हे सगळं झाल्यानंतर आसावरी जगदाळे हिने तिथले पोलीस कर्मचारी,सैन्य दलाचे पोलीस कमिशनर आणि सुप्रिया सुळे अशा मोठ्या लोकांना फोन करून तिने त्यांच्याकडून मदत मिळवली. ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळी तिथे स्थानिक लोक जास्त कोणी नव्हते. हल्लेखोरांच्या गोळीबाराचा आवाज आला की तेथील स्थानिक लोक, स्टॉलवाले लगेचच पळून गेले. तेथील लोक हल्लेखोरांशी मिळालेले असतील की काय असा आम्हाला संशय आहे. कारण तो फोटोग्राफर गोळीचा आवाज झाला की पटकन पैसे घेऊन पळून गेला. जर वाघ आलाय असं म्हणत होते, तर तो फोटोग्राफर आणि बाकीचे तिथे लपले असते. पण, तिथले स्थानिक लोक लगेचच पळून गेले होते.
आम्ही पटापटा टिकल्या काढल्या
हल्लेखोर बोलत होते तेव्हा आसावरीने आम्हाला टिकल्या काढायला लावल्या. आम्ही पटापटा टिकल्या काढल्या जोरजोरात "अल्लाह-हू-अकबर" म्हणत होतो. तो हल्लेखोर म्हणाला, तुमच्या लोकांनी आम्ही मुलींना आणि बायकांना मारले अशी अफवा पसरवली आहे. जा आता जाऊन सांगा तुमच्या मोदींना की आम्ही मुलींना आणि बायकांना काहीच करत नाही. आम्ही फक्त आम्ही पुरुषांना टार्गेट केलं. तिथे स्थानिक आणि ज्यांचे स्टॉल होते, दुकान होती ते सगळे पळून गेले होते. तिथे भरपूर गर्दी होती. तिथे सुरक्षा रक्षक असायला हवे होते. एक-दोन तरी सुरक्षारक्षक तिथे असताना हवे होते. त्यांच्या भीतीने हल्लेखोर तिथे आले तर नसते, असंही पुढे त्यांनी सांगितलं आहे.