Pune Accident News : पुण्यात अपघाताचं (Pune Accident News) प्रमाण वाढलं आहे. बारामतीच्या मोरगावमधील खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचा अचानक ब्रेक फेल झाला. मात्र, आज सकाळी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांच्या धक्का बसत आहे.
वरंधघाट मार्गे रायगड किल्ल्यावर विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जात असताना पुण्याच्या भोरमधील चौपाटी परिसरात हा अपघात घडला आहे. बारामतीच्या मोरगावमधील खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना घेऊन बस सहलीला निघाली होती. बसमध्ये 34 विद्यार्थी होते. चालकाच्या बसचं ब्रेक फेल झाल्याचं लक्षात येताच चालकाने रस्त्यावरच्या नागरिकांना सावध करत चालत्या बसमधून उडी मारून चाकाखाली दगड लावल्यानं बस नियंत्रणात आली आणि मोठा अपघात टळला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
सीसीटीव्हीत अपघाताचा थरार कैद
ब्रेक फेल झाल्यानंतरचा अपघाताचा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. भोर वरंधघाट मार्गे रायगडला निघाली होती. मांढरदेवीचं दर्शन घेतल्यानंतर भोरच्या चौपाटी जवळ बसचा ब्रेक एअर पाईप फुटल्यान बसचे ब्रेक निकामी झाले. हा सगळा प्रकार लक्षात येताच चालकांने फिल्मी स्टाईल बसमधून खाली उडी घेतली आणि बाजूला असलेला मोठा दगड चाकाखाली टाकला. त्यामुळे बस थांबवण्यासाठी मदत झाली. आजुबाजूच्या लोकांनीदेखील बसला थांबवण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे 34 जणांचे प्राण वाचले. त्याच रस्त्यावर ही घटना घडल्याने काही वेळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. विद्यार्थीदेखील घाबरलेल्या अवस्थेत होते. बसमध्ये एकून 34 विद्यार्थी होते.
अपघात कधी थांबणार?
पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी भोर परिसरात एका बसने पेट घेतला होता. थोड्या प्रमाणात या आगीची चाहूल लागताच चालकाने सर्व प्रवाशांना बाहेर काढलं होतं. त्यानंतर बसमध्ये अचानक भडका उडाला होता. या चालकांच्या प्रसंगावधानामुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे सगळ्यांकडून चालकांचं कौतुक करण्यात येतं. मात्र अपघात कधी थांबतील आणि नागरिक सुरक्षित प्रवास कधी करु शकतील , असा प्रश्न अनुत्तरीतच आहे.