श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी 40 किलोंचे दागिने!
एबीपी माझा वेब टीम | 22 Aug 2017 07:22 PM (IST)
आकर्षक नक्षीकाम, हत्ती शिल्प, मोरतुरे आणि नवग्रहांच्या समावेशासह 8 ते 10 हजार खडयांची सजावट असलेला साडेनऊ किलोचा मुकुट बाप्पासाठी साकारण्यात आला आहे.
पुणे : पुण्याचे लाडके दैवत म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. यंदा सार्वजनिक गणेश उत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त नवीन दागिने तयार करण्यात आले आहेत. थोडे थोडके नव्हे तर तब्बल ४० किलो सोन्याचे दागिने बाप्पासाठी तयार करण्यात आले आहेत. यामध्ये आकर्षक नक्षीकाम, हत्ती शिल्प, मोरतुरे आणि नवग्रहांच्या समावेशासह 8 ते 10 हजार खडयांची सजावट असलेला साडेनऊ किलोचा मुकुट बाप्पासाठी साकारण्यात आला आहे.