पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची पाठराखण करणाऱ्या नामदेव शास्त्रींच्या कार्यक्रमाला विरोध होताना दिसत आहे. पुण्याच्या देहूतील भंडारा डोंगरावर नामदेव शास्त्री महाराजांचे कीर्तन येत्या 7 फेब्रुवारी ला होणार आहे. मात्र हे कीर्तन रद्द करावे, अशी मागणी अखिल मराठा समाजाने भंडारा डोंगर सप्ताह समितीकडे करण्यात आली आहे. भंडारा डोंगर मंदिर समिती याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष आहे. या मागणीला दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची किनार आहे. भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे, या सप्ताहात शास्त्री महाराजांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. बीड मधील परिस्थिती पाहता आता भंडारा डोंगर सप्ताह समिती काय निर्णय घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. संस्थान उद्यापर्यंत याबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहे. दुसरीकडे मराठा समाजाने मात्र हा कीर्तन सोहळा संस्थानने रद्द केल्याचा दावा केला आहे. 

Continues below advertisement


याबाबतचं एक पत्र देखील देण्यात आलंय त्यामध्ये नामदेव सानप महाराज यांनी मस्साजोग येथील सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या हत्येशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधित असलेले आरोपी यांच्याबाबतीत समर्थनाची भूमिका घेतली असल्याची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. ज्या मंत्र्याच्या पाठबळावर आरोपीनी हे कृत्य केले त्या मंत्र्याने जनतेचा रोष समजून राजीनामा द्यायला हवा. तर हे नामदेव महाराज त्यांची पाठराखण करत असल्याची गोष्ट समोर आली आहे. वास्तविक पाहता सांप्रदायिक क्षेत्रातील महाराज लोकांनी जातीपासून, पुढारी लोकांपासून, गुन्हेगारी करणाऱ्या लोकांपासून चार हात लांब दूर राहिले पाहिजे, असं म्हटलं आहे.


नेमकं काय लिहलंय पत्रात?


अखंड मराठा समाजा पुणे जिल्हा यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की, नामदेव सानप महाराज यांनी मस्साजोग येथील सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या हत्येशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधित असलेले आरोपी यांच्याबाबतीत समर्थनाची भूमिका घेतली असल्याची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. ज्या मंत्र्याच्या पाठबळावर आरोपीनी हे कृत्य केले त्या मंत्र्याने जनतेचा रोष समजून राजीनामा द्यायला हवा. तर हे नामदेव महाराज त्यांची पाठराखण करत असल्याची गोष्ट समोर आली आहे. वास्तविक पाहता सांप्रदायिक क्षेत्रातील महाराज लोकांनी जातीपासून, पुढारी लोकांपासून, गुन्हेगारी करणाऱ्या लोकांपासून चार हात लांब दूर राहिले पाहिजे. परंतू हे महाशय आरोपीना निकटवरतीय म्हणणाऱ्या लोकांना सांप्रदायिक क्षेत्रात असता तर संत झाला असता अशी उपमा देतात. हे महाराष्ट्राच्या साधू संताच्या भूमिला कधीच पटणारे नाहीये. महाराष्ट्राच्या संत परंपरेला नामदेव सानप यांनी काळिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांचे कीर्तन पुरोगामी आणि संताच्या भूमिमध्ये करण्यास त्यांना कोणताही अधिकार नाही. जगद्‌गुरु संत श्री तुकाराम महाराज संस्थान ह्यांनी त्यांचे कीर्तन / प्रवचन रद्द करावे अशी विनंती अखंड मराठा समाज यांच्यावतीने करण्यात येत आहे.


कोण आहेत नामदेव शास्त्री?


नामदेव शास्त्री हे अहिल्यानगरच्या पाथर्डी येथील भगवान गडाचे महंत आहेत. भगवानगड हा वंजारी समाजाचं श्रद्धास्थान मानलं जातं. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी भगवानगडावर फक्त मराठवाडाच नाही तर राज्यभरातून भाविकांची गर्दी होते. भगवानबाबांच्या निधनानंतर महंत भीमसिंह महाराज यांना गादीवर बसवण्यात आलं, भीमसिंह महाराजांच्या नंतर आता महंत नामदेव शास्त्री महाराज या गादीवर नियुक्ती करण्यात आली आहे.


 नामदेव शास्त्रींनी न्यायाचार्य या पदवीसाठी मुंबई, आळंदी येथे शिक्षण घेऊन एम. ए. पदवी प्राप्त केलेली आहे. त्यानंतर पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी भगवान गडाची गादी सांभाळली. 2016 साली पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात झालेला मोठा संघर्ष आजही चर्चेचा विषय आहे. भगवानगडावरुन राजकीय भाष्य नको असं म्हणत नामदेव शास्त्रींनी त्यावेळी पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला विरोध केलेला होता. शेवटी पंकजा मुंडेंना भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घ्यायला लागला होता. 2017 ला पंकजा मुंडेंनी भगवानबाबांचं गाव असलेल्या बीडच्या सावरगावात दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केली होती, भगवान भक्तीगड असं त्यांनी त्यांचं नामकरण केलं.