Bhima-Koregaon Vijay Stambh: भीमा कोरेगाव येथे आज (1 जानेवारी) 208 वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शौर्य दिनानिमित्त लाखो भीम अनुयायी राज्यभरातून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार भीमा कोरेगाव येथे पोहोचत विजयस्तंभाला अभिवादन केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केले. प्रशासनाकडून तयार करण्यात आलेली तयारी पाहून प्रकाश आंबेडकर यांनी समाधान व्यक्त केले.
जातीप्रता, व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा होता, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. अजित पवार म्हणाले की, आज मी अभिवादन करण्यासाठी आलो आहे. प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. सर्व निधी या ठिकाणी देण्यात आला आहे. चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. दुपार नंतर गर्दी वाढेल.
जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी
जिल्हा परिषदेकडून 23 आरोग्य केंद्रे, 43 रुग्णवाहिका, 18 खासगी रुग्णालयांतील 286 खाटा आरक्षित, 155 प्रशिक्षित मनुष्यबळ, उपहारगृह व टँकरकरिता 33 तपासणी पथके, 80 घंटागाड्या, शुद्ध पाण्याच्या व्यवस्थेसाठी 150 टँकर्स, पाणी भरण्याच्या ठिकाणी 200 कर्मचारी नियुक्त, 2 हजार 800 शौचालये, 265 सफाई कामगार, 260 पर्यवेक्षण अधिकारी व कर्मचारी, 9 हिरकणी कक्ष आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. पुणे शहर पोलिस आयुक्तालयाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 1 महानिरीक्षक, 3 पोलिस उपमहानिरीक्षक, 20 पोलिस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, 8 राज्य राखीव पोलिस दल तुकड्या, 3 शीघ्र प्रतिसाद दल, 14 घातपातविरोधी पथके, 18 बीडीडीएस पथके, 650 होमगार्ड, 4 हजार 700 पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण सोहळ्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता फेस रिकग्नायजेशनकरिता 251 ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. 19 ठिकाणी वाहनतळाच्या माध्यमातून 20 हजार चारचाकी वाहनाची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
