Pune City water Supply: पुणेकरांवर पुन्हा पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. पुण्यात येत्या गुरुवारी (4 ऑगस्टला ) काही परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी कमी दाबाने आणि उशीरा पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना पाण्याच्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवाठा विभागाकडून दिली आहे.


या परिसरात पाणी बंद असेल...
पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती,पद्मावती,इंदिरानगर पंपींग) - शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परीसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर(कोंढवा खुर्द)  परीसर,पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र या परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.


लष्कर जलकेंद्र भाग- लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परीसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी, कॅम्पच्या या परिसरात देखील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.


पाणी कपात मागे घेतली होती...


धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेने (PMC) अखेर पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला होता .जुलै महिन्यात एकदिवसाआड पाणीपुरवठा होणार होता. प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले गेले होते. मात्र योग्य पाऊस पडल्याने ही पाणी कपात मागे घेण्यात आली होती. यंदा पुणे जिल्ह्यातील चारही धरणार उत्तमरित्या पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे.