पुणे: पुण्यातील कोथरूड परिसरातील गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्यानंतर चर्चेत आलेली घायवळ गॅंग आणि निलेश घायवळवरती (Nilesh Ghaywal) पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे, तर दुसरीकडे गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) बायको आणि मुलासह युरोपला गेला होता. तो चर्चेत आल्यापासून त्याच्याबाबतची नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत, अशातचफरार निलेश घायवळचा (Nilesh Ghaywal) आणि त्यांच्या पत्नीच्या नावे दोन वेगळ्या मतदारसंघात चार मतदान ओळखपत्रे असल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणलं आहे. त्यासाठी निलेश घायवळने (Nilesh Ghaywal) नावात बदल केल्याचं दिसून येतं आहे. पुण्यातील कोथरुड विधानसभा आणि नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात निलेश आणि त्याची बायको स्वाती घायवळच्या नावे ही ओळखपत्रे आहेत.
Nilesh Ghaywal voter ID: नावांमध्ये काय केले बदल?
पती – निलेश बन्सीलाल गायवळ ओळखपत्र क्र. DRD1360288 – कोथरूड, पुणे (वय 47)TKM8217994 – कर्जत-जामखेड, अहमदनगर (वय 48)
पत्नी – स्वाती निलेश गइवालओळखपत्र क्र. SAO7387947 – कोथरूड, पुणे (वय 42)TKM8218026 – कर्जत-जामखेड, अहमदनगर (वय 33)
Nilesh Ghaywal voter ID: उघडकीस आलेल्या विसंगती
दुहेरी नोंदणी – पुणे व अहमदनगर (~150 किमी अंतर)कर्जत मतदारसंघात सलग क्रमांक (297 आणि 298) → एकत्र नोंदणी?पतीच्या नावात खेळ: निलेशकुमार गायवळ विरुद्ध निलेश गायवळ
Nilesh Ghaywal voter ID: एकच कुटुंब, 2 शहरे, 4 मतदार ओळखपत्रे!
डुप्लिकेट नोंदी, नावातील फेरफार, खोटे वय म्हणजेच मतदान बनवेगिरी, एक कुटुंब असं करू शकतं, तर अजून किती “दुबार मतदार” याद्यांमध्ये असतील याची कल्पना करा! असंही माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटलं आहे.
Vijay Kumbhar: काय म्हणालेत विजय कुंभार?
कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेला असला तरी त्याचे नवीन नवीन कारणे समोर येत आहेत. त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावावर पुणे आणि नगर येथे दोन्ही ठिकाणी मतदान ओळखपत्र असल्याचे निष्पन्न झाले आहे. अर्थातच हे मतदान नोंदणी करताना त्यांनी आपल्या नावामध्ये बरीच गडबड केल्याचे दिसून येत आहे. कधी गायवळ तर कधी गइवाल अशी नावे केली आहेत. इतकंच नव्हे तर पुण्यात जिथे त्यांनी कोथरूडमध्ये नोंदणी केली तिथे स्वतःचं नाव निलेश कुमार असं लिहिलेलं आहे, तर नगरमध्ये जिथे मतदार नोंदणी केली तिथे निलेश बन्सीलाल गायवळ असं केलं आहे, नगरमधील गावामध्ये त्यांची वडिलोपार्जित प्रॉपर्टी सुद्धा आहे. तर अशा प्रकारच्या घटना खरोखरच चिंतेची बाब आहे. निलेश घायवळने ना पुण्याचा पत्ता वापरला ना नगरचा जे त्याचा मूळ गाव आहे त्याचाही पत्ता वापरला नाही. त्या उलट अहमदनगर मध्ये कुठलातरी पत्ता वापरून पासपोर्ट घेतला तर पुढे आलेला आहे. म्हणजे हे दोन्ही वोटिंग कार्ड त्याने वापरलेली नाहीत नगरचा देखील वेगळच कार्ड वापरलं तिथे त्याला कोणी मदत केली, हा भाग पुढे येईलच परंतु सध्या मुद्दा आहे तो बनावट मतदार नोंदणीचा, अशाप्रकारे नावात किंचित बदल करून किंवा जसं नाव आहे तशा नावासह जर महाराष्ट्रामध्ये किंवा दुसरीकडे कुठेही नोंदणी केली तर दोन-दोन, तीन ठिकाणी तर ते अत्यंत चिंतेची बाब आहे. याची चौकशी झाली पाहिजे. हे एकमेव उदाहरण समोर आलं आहे असे अनेक प्रकार समोर येऊ शकतात. अशा प्रकारची महाराष्ट्रामध्ये हजारो नोंदणी झालेले असण्याची शक्यता आहे. असही पुढे विजय कुंभार यांनी म्हटलं आहे