पुणे : वैष्णवी हगवणेच्या (Vaishnavi Hagawane Death) बाळाची हेळसांड करणारा बंदूकधारी निलेश चव्हाण पोलिसांच्या चुकांमुळं फरार झाला, असा आरोप वैष्णवीचे काका मोहन कस्पटे यांनी केला आहे. राजेंद्र हगवणे पवना धरणावरील बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर होता, याची माहिती पोलिसांना दिली होती. परंतु हगवणे तिथं नव्हते असं पोलिसांना कळवलं, अटकेनंतर मात्र हगवणे त्यांच्या फार्म हाऊसवर होते. हे समोर आलं आहे. त्यामुळं हगवणे पसार झाले, अगदी तसंच काहीस निलेश चव्हाणच्या बाबतीत घडलं आहे. पोलीस त्याच त्या चुका वारंवार करत आहेत. प्रत्येक वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलिसांना आदेश देण्याची वेळ का येते? अशी खंत ही वैष्णवीच्या (Vaishnavi Hagawane Death) कुटुंबायांनी केली.
एपीबी माझाशी बोलताना वैष्णवीचे काका मोहन कस्पटे म्हणाले की, पोलिसांना जेव्हा कल्पना दिली होती, तेव्हाच जर पोलिसांनी त्याला अटक केली असती, तर तो आज पळाला नसता. तो निलेश चव्हाण कुठे गेला आहे त्याचा शोध पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावा. ज्याप्रमाणे राजेंद्र हगवणे मुलगा सुशील पळाले, त्यावेळी अजित पवार यांनी तातडींना पकडायला सांगितलं होतं त्यानंतर ते सापडले, तर तसं होऊ नये. पोलिसांनी तत्परता दाखवून तातडीने त्याला अटक केली पाहिजे. त्यामुळे आपल्या तपासालाही गती येईल, असं मला वाटतंय असंही मोहन कस्पटे यांनी म्हटले आहे.
वरिष्ठांकडून बोलल्यानंतर तपास होतो. सर्वसामान्य गेल्यावरती थोडा विलंब होत आहे हे जाणवत आहे, नाहीतर तो पळून गेला नसता. गेल्यावेळी आम्ही बंडू फाटकांच्या फार्म हाऊस राजेंद्र हगवणे आहे असं कळलं होतं, त्याची माहिती पोलिसांना दिली तेव्हा त्यांनी तिथे ते नाही असं सांगितलं आणि आता तपासात दिसत आहे की, ते तिथं होते. बंडू फाटकच्या इथे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे असल्याची माहिती आम्ही पोलिसांना दिली होती. आम्ही लोकेशन सांगितलं होतं. साहेबांनी चौकशी केली तर तेव्हा ते म्हणाले होते तिथे ते नाहीत. आता तपासांती समजत आहे की त्या तिथेच होते. आमची बातमी देखील शंभर टक्के खरी होती याची पुष्टी आम्हाला मिळत आहे. या निलेश चव्हाणचा देखील लवकरात लवकर तपास व्हावा अशी आमची मागणी आहे.
होय, हगवणे माझ्या फार्म हाऊसवर आलेले पण..
सून वैष्णवीचा हुंडाबळी घेतल्यावर फरार झालेला राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील वडगाव मावळमध्ये गेले होते. तिथं शिरोली-चांदोली गावचे सरपंच बंडू फाटकांच्या फार्म हाऊसवर दुपारची विश्रांती घेतली, हे तेचं फार्म हाऊस आहे, जे पवना धरण परिसरात आहे. यामुळं अडचणीत आलेल्या बंडू फाटक यांनी मात्र मला हगवणेंनी केलेल्या कृत्याची कल्पना नव्हती. मी मुलाच्या लग्न सोहळ्यात व्यस्त होतो, त्यावेळी मला माझे मित्र बंडोपंत भेगडेंचा फोन आला, त्यांनी माझं हगवणेंशी बोलणं करुन दिलं. त्यावेळी हगवणेंनी मी तुमच्या फार्म हाऊसवर थांबतोय असं कळवलं. त्यामुळं मी राहू दिलं. पोलिसांना मी याची कल्पना दिली असून यापुढं ही चौकशीला बोलवलं तर मी नक्की सहकार्य करेन, असं बंडू फाटक म्हणालेत.