पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. मागील काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्यात मोठी वाढ झाली. याबाबत अमोल कोल्हे यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिाय दिली. सातत्याने जे सर्व्हे आलेत त्यात मविआच्या बाजूनं कौल आणि पारडं जड दिसतोय. त्यामुळे पंतप्रधानांचे दौरे वाढले असावेत, असा टोला अमोल कोल्हेंनी लगावला. ते शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये बोलत होते.
पंतप्रधानांचे महाराष्ट्रात दौरे का वाढले?
पंतप्रधानांचे एखाद्या राज्यात दौरे वाढले की त्या राज्यांच्या निवडणुका लागल्या, असं म्हटलं जातं. तूर्तास राज्यातील सरकार सक्षम आहे, असं ते म्हणतात. त्यामुळं तूर्तास तरी निवडणुका लागणार नाहीत, असं चित्र आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक खासदार आहेत. परंतु सातत्याने जे सर्व्हे आलेत त्यात मविआच्या बाजूनं कौल आणि पारडं जड दिसतोय. त्यामुळे पंतप्रधानांचे दौरे वाढले असावेत, असा टोला अमोल कोल्हेंनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला येणार आहेत, त्यांची भेट घेणार का?
पंतप्रधान हे संसदेत फारसे दिसले नाहीत. संसदेत आम्ही बोलतो तेंव्हा ते तोंड बंद करतात. मात्र एवढे शेतकरी मंत्री जर या मोर्चाची दखल घेत असतील तर त्यांनीच शेतकऱ्यांचे हे त्यांनी दिल्ली दरबारी ठामपणे मांडावेत, असे कोल्हे म्हणाले.
परदेशातून सर्वाधिक प्रकल्प महाराष्ट्रात आणले, फडणवीसांच्यावर दाव्यावर कोल्हेंचा तिखट प्रतिक्रिया
आकडेवारी ही सांगत राहणं, याची महाराष्ट्राला सवय झालेली आहे. खरोखर नेमके किती रोजगार निर्माण होतात, यावर ते अवलंबून आहे. कारण भाजप जेंव्हा इतक्या विश्वासाने सांगतं, तेंव्हा काही दिवसांनी ते म्हणतात "ये तो जुमला था." असा टोला कोल्हेंनी लगावला.
गडकरींकडून पवार साहेबांचं कौतुक, काय म्हणाले अमोल कोल्हे
गडकरी साहेबांबाबत देशातील प्रत्येकाला नितांत आदर आहे. संसदेत जेंव्हा ही ते बोलतात, तेंव्हा गेल्या साडे चार वर्षात त्यांच्यावर एकाने ही आरोप केलेलं पाहिलं नाही. गडकरी साहेब हे सर्वसमावेशक काम करतात, म्हणून त्यांची बात ही अलग है.
एकनाथ शिंदे-राज ठाकरे आणि शरद पवार-बच्चू कडू भेट
या भेटी राजकारणातील सुसंस्कृतता सिद्ध करते, राजकारणात कोणी कोणाचं वैर नसतो. त्यामुळं ही सुसंस्कृतता जपली गेली पाहिजे, असे कोल्हे म्हणाले.
मंत्री अनिल पाटलांच्या आरोपांना उत्तर
काहीवेळा एक मंत्री म्हणाले सेलिब्रिटी आहे असं म्हणतात त्यांचं काही राजकारणात चालत नाही, असं म्हणतात. मी शेतकऱ्यांचा पोरगा आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बोलणारच. आता राजकारणात राहून अभिनय करण्यापेक्षा अभिनय करताना राजकारण करणं बरं. किमान सच्चाई आणि सच्चेपना शेतकऱ्यांसह मातीशी इमान राखण महत्वाचं आहे. माझी हीच विनंती आहे, की टीका टिप्पणी करण्यापेक्षा हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे हे लक्षात ठेवा, असे कोल्हे म्हणाले.
कोल्हेंनी अजित दादांची फसवणूक, हसन मुश्रीफ यांच्या आरोपाला उत्तर
हसन मुश्रीफ यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाही, पण त्यांचा गैरसमज झाला असेल तर दूर करेन. त्यांना सर्व गोष्टी ठाऊक नसतील, मात्र पवार साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकून मला संसदेत पाठवलं. त्या निष्ठेला जपावं, याला फसवणूक म्हणत असाल तर मला निष्ठेसाठी नवीन शब्द शोधावा लागेल.