एक्स्प्लोर

Anna Bansode: गुन्हेगारांसोबत फोटो व्हिडीओवरून पक्षाच्या अध्यक्षांची तंबी; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचं गुन्हेगारासोबत बर्थडे सेलिब्रेशन, आता अजितदादा कानउघाडणी करणार?

Anna Bansode: गुंड आकाश उर्फ आक्या बॉण्ड उर्फ सुमित मोहोळ अण्णा बनसोडेंना केक भरवतानाचा आणि सोबत बनसोडे पुत्र सिद्धार्थ असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय धनंजय मुंडेंना गुंडाशी जवळीक राखणं चांगलंच भोवलं. त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. त्यानंतर अजित पवारांनी पक्षातील सर्व नेत्यांना तंबी देत फोटो व्हिडीओ काढताना काळजी घ्या असं म्हटलं होतं. याची जाणीव असताना ही अनेक नेते गुन्हेगारांचं उदात्तीकरण जाणीवपूर्वक करतात आणि मग ते अडचणीत ही येतात. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे (Anna Bansode) ही अशाच एका गुन्हेगारामुळं चर्चेत आले आहेत. निमित्त बनसोडेंच्या वाढदिवसाचं होतं. गुंड आकाश उर्फ आक्या बॉण्ड उर्फ सुमित मोहोळ थेट बनसोडेंना केक भरवतानाचा आणि सोबत बनसोडे पुत्र सिद्धार्थ असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात उतरलेल्या आक्या बॉण्डला बनसोडेंनी स्वतःच्या बर्थडे निमित्त केक भरवला. हे पाहून बनसोडे गुन्हेगारांचं उदात्तीकरण तर करत नाहीत ना? अशी चर्चा सध्या परिसरात रंगलेली आहे. परंतु अशा घटनांना थारा न देणारे अजित पवार आता बनसोडेंची कानउघाडणी करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

सोशल मीडियावर पोस्ट

पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे मंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना नेहमीचं डावलत आले. बनसोडेंनी मात्र अजित दादा मला मंत्री करणार असा अट्टाहास लावून धरला. सरतेशेवटी अजित दादांनी बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी वर्णी लावली. पण या पदाची जबाबदारी सोपवताना अजित दादांनी बनसोडेंना उपाध्यक्ष पदाची गरिमा राखण्याचा सल्ला नक्कीच दिला असणार. बनसोडेंनी सुद्धा या पदाला साजेसं आणि राज्याच्या हिताचं काम करेन असं अनेकदा सांगितलं. अशातच विधानसभा उपाध्यक्षपदी बसल्यानंतर बनसोडेंचा पहिला वाढदिवस साजरा होत होता. त्याचवेळी गुंड आक्या बॉण्डची एन्ट्री झाली. साहेब असा उल्लेख असलेला केक आणि बुके घेऊन तो आला. आक्याबॉण्डच्या उजव्या बाजूला बनसोडे आणि डाव्या बाजूला पुत्र सिद्धार्थ उभे राहिले. मग उपाध्यक्ष बनसोडेंनी केक कापला. बनसोडे आणि आक्याबॉण्डने एकमेकांना केक ही भरवला, याची रील सोशल मीडियावर ही पोस्ट करण्यात आली आणि ही बाब उजेडात आली.

त्याच्यावर 16 गुन्हे दाखल 

बनसोडे पुत्र सिध्दार्थच्या पेजवर सुद्धा ही रील होती, नंतर मात्र ही रील डिलीट करण्यात आल्याचं ही बोललं जात आहे. आक्या बॉण्डने अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकलं आहे, आजवर त्याच्यावर 16 गुन्हे दाखल आहेत. मोक्का अंतर्गत त्याच्यावर कारवाई सुद्धा झाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हे पाहता बनसोडेंनी त्याच्यासोबत स्वतःचा बर्थडे कसा काय साजरा केला? एकवेळ बनसोडेंना याची कल्पना नाही, असं गृहीत धरलं तर मुलगा सिद्धार्थला हे नक्कीच ठाऊक असणार? मग त्याने आक्या बॉण्डला का रोखलं नाही? असा सवाल उपस्थित झाला आहे.

बनसोडे आधीही आलेले अडचणीत

बनसोडे पुत्र सिद्धार्थमुळं या आधी ते अडचणीत आलेले आहेत. एका ठेकेदाराच्या मॅनेजरला मारहाण प्रकरणी सिद्धार्थने जेलची हवा खाल्ली होती. त्यावेळी अजित दादांनी बनसोडेंना शेलक्या शब्दात सुनावलं सुद्धा होतं. त्यानंतर आता आक्या बॉण्डमुळं ही बनसोडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. बनसोडे गुन्हेगारांचं उदात्तीकरण करतायेत का? अशी चर्चा रंगलेली आहे. परंतु अशा घटनांना थारा न देणारे अजितदादा आता बनसोडेंची कानउघाडणी करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

व्हायरल फोटोवर अन् व्हिडीओवर अण्णा बनसोडे प्रतिक्रिया

हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हणाले, ' मी आक्या बॉण्डला कधी भेटलो नाही, त्यामुळं त्याला मी ओळखत असण्याचा संबंध येत नाही. त्याला माझ्या बर्थडे वेळी मी पहिल्यांदा त्याला पाहिलं. हजारो समर्थक शुभेच्छा द्यायला आले होते, त्यात तो एक होता. मी गुन्हेगारांचं उदात्तीकरण कधी करणार नाही", असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. 

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime Ravindra Dhangekar: खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Dharashiv FDA Raid News: धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
Embed widget