पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात (bhimashankar temple) व्हीआयपी दर्शनावरून वाद निर्माण झाला आहे. मंदिर दुरुस्तीच्या कामामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मात्र भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांच्यासाठी मंदिर खुले करून व्हीआयपी दर्शन देण्यात आल्याचा आरोप होत आहे. डॉ. निशिकांत दुबे हे झारखंडच्या गोड्डा मतदार संघातून चार वेळा भापकडून निवडून आलेले खासदार आहे. सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी ९ जानेवारी २०२६ पासून तीन महिन्यांसाठी भीमाशंकर मंदिर (bhimashankar temple)  बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हजारो किलोमीटर पायी व सायकल वारी करून येणाऱ्या भाविकांनाही दर्शन न घेता परत जावे लागत आहे. अशातच हेलिकॉप्टरने आलेल्या खासदार डॉ. निशिकांत दुबे यांना विशेष परवानगी देऊन मंदिरात दर्शन घडवण्यात आल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय नेत्यांसाठी मंदिर खुले आणि सर्वसामान्यांसाठी बंद का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. महादेवाच्या मंदिरात दुजाभाव का? प्रशासनावर भाविकांचा संताप व्यक्त होत आहे, यावरती आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त करत सवाल उपस्थित केले आहेत.(bhimashankar temple) 

Continues below advertisement

रोहिणी खडसे यांनी सोशल मिडीया एक्सवरती पोस्ट करत म्हटलंय की, "बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले आपल्या महाराष्ट्रातील भीमाशंकर मंदिर पुरातत्त्व विभागाच्या कामासाठी गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य भाविकांसाठी बंद आहे पण भाजपचे खासदार @nishikant_dubey यांच्यासाठी हे मंदिर खुले करण्यात आले. हे निशिकांत दुबे कोण आहेत माहिती आहे का ? जे नेहमी मराठी माणसाला कमी लेखतात, जे नेहमी मराठी माणसांबद्दल चुकीचे विधान करून मराठी माणसांचा स्वाभिमान दुखवतात. एकदा ते म्हणाले की "मराठी लोगो को हम पटक पटक के मारेंगे”. आज त्याच निशिकांत दुबे साठी महाराष्ट्रातील प्रशासन पायघड्या घालत आहे. सामान्य माणसांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रद्रोही निशिकांत दुबे यांना वेगळा न्याय का ? दुबे काय तुमचा जावई आहे का?", असं म्हणत खडसेंनी संताप व्यक्त केला आहे.(bhimashankar temple) 

नेमकं काय घडलं?

मंदिर दुरुस्तीच्या कामामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. परिणामी नियमाप्रमाणे कुठल्याही भाविकाला मंदिरात प्रवेश आणि दर्शन घेता येत नाहीये. असेअसताना मात्र भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे (BJP MP Nishikant Dubey) यांच्यासाठी हे मंदिर खुले करून थेट व्हीआयपी दर्शन देण्यात आल्याचा आरोप होत आहे. डॉ. निशिकांत दुबे हे झारखंड च्या गोड्डा मतदार संघातून चार वेळा भापकडून निवडून आलेले खासदार आहेत. या व्हीआयपी दर्शनावरून (VIP Darshan) भीमाशंकर मंदिर प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडलंआहे. (Bhimashankar Temple Opened for BJP MP Nishikant Dubey)

Continues below advertisement