पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर (Pimpri Chinchwad Deputy Mayor) होत असलेल्या पिंपरी चिंचवड महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत काही वेगळं घडेल का? अशी चर्चा रंगलेली आहे. कारण महापौर बिनविरोध करु इच्छिणाऱ्या अजित पवार राष्ट्रवादीनं उपमहापौर (Pimpri Chinchwad Deputy Mayor) पदासाठी मात्र वैशाली काळभोरांचा अर्ज दाखल केला आहे. 128 पैकी 37 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीच्या पारड्यात उपमहापौर पद पडणार नाही, हे उघड आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपकडून उपमहापौर (Pimpri Chinchwad Deputy Mayor) पद हवंय का? दिवंगत अजित दादांच्या सहानुभूतीचा आधार घेऊन, असं काही घडवायचं आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.(Pimpri Chinchwad Deputy Mayor)
खरं तर हे उघडपणे कोणी ही बोलायला तयार नाही. पण खाजगीत अशी इच्छा राष्ट्रवादीचे काही नेते बोलून दाखवतात आणि प्रत्यक्षात कृती ही तशीच करतात. भाजपच्या रवी लांडगे विरोधात महापौर पदासाठी उमेदवार द्यायचा नाही अन शर्मिला बाबरांच्या विरोधात उपमहापौर पदासाठी निवडणूक लावून ते अप्रत्यक्षपणे तिचं मागणी करतायेत. स्थानिक भाजपला हे मान्य नसल्याचं दिसून येतं आहे. मात्र राज्य पातळीवरील नेत्यांनी याबाबत हालचाली कराव्यात, अशी स्थानिक राष्ट्रवादीची इच्छा असल्याचं दिसतंय. दिवंगत अजित दादांच्या सहानुभूतीचा आधार यासाठी घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी रवी लांडगे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपचा दुसऱ्या टर्म मधील पहिला महापौर होण्याचा मान रवी लांडगे यांना मिळाला आहे. रवी लांडगे सलग दोन वेळा बिनविरोध नगरसेवक झाले आहेत. उपमहापौर पदी भाजपचे निष्ठावान शीतल उर्फ विजय शिंदे यांची निवड झाली होती. मात्र अचानक उपमहापौर पदाचे उमेदवार बदलण्याची वेळ आली आहे. पिंपरी चिंचवड मध्ये ऐनवेळी ट्विस्ट आलाय. भाजपवर उपमहापौर पदाचे उमेदवार बदलण्याची वेळ आली. शीतल शिंदे पालिकेतून निघून गेल्यानं शर्मिला बाबरांचा अर्ज दाखल करण्यात आला. तर महापौर पदासाठी रवी लांडगे यांचा अर्ज दाखल केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर पदासाठी अर्ज दाखल केला नसला तरी उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबरांच्या विरोधात वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केलाय.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 128 जागांसाठी 15 जानेवारीला मतदान झालं होतं. पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 65 जागांची गरज आहे. हा आकडा भाजपने पार केला आहे. (Pimpri Chinchwad election results 2026) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या लढाईत भाजपने एकतर्फी बाजी मारली.
पिंपरी चिंचवडमध्ये कोणत्या पक्षाचे किती विजयी उमेदवार
भाजप - 84राष्ट्रवादी - 37शिवसेना - 06अपक्ष - 01
