Nathuram Godse and Gopal Godse: नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते, अशी कबुली सावरकरांचे आणि गोडसेंचे नातू असलेल्या सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) यांनी पुण्यातील न्यायालयात दिली आहे. सात्यकी सावरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) विरोधात दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातील विशेष न्यायालयात सुरु आहे. या सुनावणीदरम्यान राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार यांनी सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी घेतली. या दरम्यान वकील मिलिंद पवार यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सात्यकी सावरकर यांनी नथुराम गोडसे (Nathuram Godse) आणि गोपाळ गोडसे (Gopal Godse) हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते, असे सांगितले. गोपाळ गोडसे हे सात्यकी सावरकर यांची आई हिमानी सावरकर यांचे वडील होते. (Pune Latest news) सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात पुण्यात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला आहे. हा खटला राहुल गांधी यांच्या 5 मार्च 2023 रोजी लंडनमध्ये केलेल्या भाषणातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबतच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांशी संबंधित आहे. या खटल्याची गेल्या महिन्यातही सुनावणी झाली होती. त्यावेळीही सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या दाव्यांचे खंडन केले होते. सावरकरांनी कधीही ब्रिटीशांशी तडजोड केली नाही. उलट सावरकरांची संपत्ती, घर, वाडी हे सर्व ब्रिटीशांनी जप्त केले होते, असे सात्यकी सावरकर यांनी म्हटले होते.

Continues below advertisement

Supreme Court on Rahul Gandhi : इतिहास माहिती नसताना स्वातंत्र्य सैनिकांबाबत बोलू नका, न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान प्रकरणात लोकसभा विरोधी पक्षनेते तथा राहुल गांधी यांच्याविरुद्ध लखनौ न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला स्थगिती दिली होती. जर भविष्यात त्यांनी पुन्हा असे विधान केले तर न्यायालय त्या विधानाची दखल घेईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की, 'तुम्ही महाराष्ट्रात असे विधान केले. तिथे लोक त्यांची पूजा करतात. तुमच्या आजीनेही सावरकरांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते. महात्मा गांधी जेव्हा ब्रिटीश अधिकाऱ्यांना पत्रे पाठवत असत तेव्हा ते लिहित असत, तुमचा विश्वासू सेवक. तर त्यामुळे तुम्ही महात्मा गांधींना इंग्रजांचे सेवक म्हणणार का? स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणे चुकीचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

Continues below advertisement

आणखी वाचा

Rahul Gandhi: सावरकर बदनामी प्रकरण! राहुल गांधींना नाशिक न्यायालयाचा मोठा दिलासा, खटला रद्द