पुणे : पुण्यातील ससून (Sasoon Hospital Drug Racket) रुग्णालयातून ड्रग्स माफिया ललिल पाटील पळून गेल्यानंतर राजकीय नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या ससूनमधील ड्रग्स रॅकेट प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. त्यातच राज्यकर्त्यांच्या सहभागाशिवाय ससूनमधील ड्रग्स माफिया ससूनमधून पळून जाऊ शकत नाही, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षा नाना पटोले यांनी केला आहे.
नाना पटोले म्हणाले की, सुषमा अंधारे आणि आमदार रविंद्र धंगेकरांनी ससून रुग्णालयातील ड्रग्स रॅकेट प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. याचा अर्थ त्यांच्याकडे या प्रकरणी ठोस पुरावे असतील. या प्रकरणी आमच्याजवळही काही पुरावे आहेत. मात्र आम्ही हे सगळे पुरावे योग्य वेळी नक्की मांडू, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ड्रग्स माफिया पळून जाण्यात राजकीय हस्तक्षेप आहे. त्याशिवाय पोलिसांचा पहारा असताना पळून जाणं शक्य नाही. मात्र सुषमा अंधारेंनी नाव सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणी त्याच पुरावा देतील, असंही ते म्हणाले.
भुसेंना बदनाम करण्याचा डाव; उदय सामंत
याच प्रकरणी आता मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे. दादा भुसे यांना बदनाम करण्याचा डाव आहे. कोणी काहीही बोलावं याला अजिबात बंधन उरलेलं नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. दादा भुसे हे मंत्रिमंडळातील अतिशय सक्रिय आणि प्रामाणिक मंत्री आहे, असं म्हणत त्यांनी दादा भुसेंचं कौतुक केलं आहे.
रविंद्र धंगेकरांनी कोणते आरोप केले?
ड्रग्स माफिया ललित पाटील पळून जाण्यात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची भेट घेऊन ललित पाटील याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती मागितली. मात्र, डीननी ही माहिती देण्यास नकार दिल्याने आमदार रवींद्र धंगेकर यांनी डीनच्या केबिनमध्येच ठिय्या मांडला. डीननी माहिती न दिल्याने आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससूनच्या कारभाराबाबत सुनावले. ललित पाटीलवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
सुषमा अंधारेंनी थेट नावच सांगून टाकलं...
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा फोन गेला होता, त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा असा थेट आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्यांनी केलेल्या आरोपामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे.
ही बातमी वाचा: