एक्स्प्लोर

मोहसीनच्या मंडपात नरेंद्रचं लग्न, पुण्यात पावसाने धर्माच्या भिंती वाहून नेल्या, शादी मुबारकसोबत मंगलाष्टकांचेही सूर

Muslim Family help Hindu Family for wedding : मोहसीनच्या मंडपात नरेंद्रचं लग्न, पुण्यात पावसाने धर्माच्या भिंती वाहून नेल्या, शादी मुबारकसोबत मंगलाष्टकांचेही सूर

Muslim Family help Hindu Family for wedding : निसर्गापुढे ना धर्म टिकतो, ना  जात टिकते आणि  मी पणा टिकतो. धर्मापक्षा माणुसकी मोठी असते असं काय म्हटलं जातं.  याचचं मूर्तिमंत उदाहरण पुण्यातील एका विवाह सोहळ्यात पाहायला मिळालं. पुण्यात कवडे आणि गलांडे यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात सुरू होता. मात्र मंगळवारी झालेल्या पावसानं या विवाह सोहळ्यावर पाणी फेरलं. हतबल झालेल्या मुलीच्या वडिलांना मात्र शेजारी एका मुस्लिम कुटुंबियांनी स्वत:च्या लेकाच्या रिसेप्शनचा मंडप उपलब्ध करुन दिला आणि शादी मुबारक म्हणत असलेल्या मंडपात थेट मंगलाष्टकाचे सूर ऐकू आले. याच संध्याकाळी जात धर्म भिंत हरली आणि माणूसकी जिंकलेली पाहायला मिळाली. 

पुण्यातील घोरपडीतील एसआरपीएफच्या अलंकार लॉनमध्ये कवडे आणि गलांडे कुटुंबियांचा विवाहसोहळा मंगळवारी संध्याकाळी रंगात आला होता. संस्कृती कवडे आणि नरेंद्र गलांडे दोघेही लग्नासाठी तयार झाले. आलिशान मंडप सजला होता. लेकीचं लग्न ग्रँड पद्धतीने करण्यासाठी चेतन कवडे सर्वतोपरी प्रयत्न करत होते. मात्र त्याच दिवशी पुण्यात मुसळधार पावसानं ग्रँड लग्नाचा मंडप आणि एकुलत्या एक लेकीच्या ग्रँड लग्नाच्या स्वप्नावर पाणी फेरलं. लग्नाचा मांडव जलमय झाला. पाहुणे, नातेवाईक आणि खुद्द नवरी-नवरदेव चिंब भिजले. लग्न थांबणार की काय, या प्रश्नाने सर्वांनाच हतबल केलं होतं. हतबल असलेल्या बापासाठी अशा कठीण वेळी जात-धर्म न पाहता दुसऱ्या बापाने हात पुढे केला. 

भिजलेला मंडप आणि आक्राळविक्राळ झालेली स्थिती झाली होती. शेजारच्या एका दुसऱ्या मंडपात  मोहसीन आणि माहीन यांचं रिसेप्शन सुरु होतं. हे पाहून वडिलांना थेट या मुस्लिम कुटुंबियांकडे जाऊन लेकीच्या लग्नात झालेली फजिती सांगितली. त्यावेळी मुस्लिम कुटुंबियांनी एका क्षणाचा विचार न करता थेट संस्कृती आणि नरेंद्र यांना घेऊन येण्यासाठी सांगितलं आणि आपल्या मुलाच्या रिसेप्शनचा हॉल लग्नासाठी वापरायला दिला.  पावसामुळे स्वतःच्या समारंभात व्यत्यय येऊनही त्यांनी हिंदू वऱ्हाडासाठी मंच मोकळा केला. आपला कार्यक्रम थांबवला आणि संस्कृती आणि नरेंद्र यांच्या लग्नाची मंगलाष्टक सुरु करायला सांगितलं.  संस्कृती आणि नरेंद्र यांचा विवाह त्या हॉलमध्ये पार पडला. सोहळा पूर्ण होताच काझी कुटुंबियांचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. एकाच मंचावर दोन वेगवेगळ्या धर्मांतील विवाह पार पडणं ही केवळ योगायोगाची नव्हे, तर ऐक्याची जिवंत मिसाल ठरली.

संस्कृती ही चेतन कवडे यांची एकुलची एक लेक. लेकीचं लग्न ठरल्यावर प्रत्येक घरात रेलचेल सुरु होते. तशीच रेलचेल कवडे कुटुंबियांत मागील तीन महिने सुरु होती. त्यात एकुलती एक लेक म्हटल्यावर लेकीच्या लग्नात सगळं ग्रँड करण्याचा मुलीच्या वडिलांचा हट्ट असतो. तोच हट्ट कवडे यांनी धरला आणि लेकीचं लग्न ग्रँड करण्यासाठी लॉन, लेकीला दीड लाखाची पैठणीपासून तर तिला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी केल्या. मात्र पावसाने बापाला हात टेकायला भाग पाडलं पण मुस्लिम कुटुंबियांनी या हतबल झालेल्या बापाला एका क्षणात तारलं. 

हौस-मौज राहिली पण लग्न झालं... मुस्लिम कुटुंबियांचे आभार मानावे तेवढे कमी

माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न असल्याने मला तिच्या लग्नाची फार हौस होती. दागिने, साड्यापासून तर सगळी तयारी आम्ही नीट केली पण पावसाने सगळं हिरावून घेतलं. पावसाच्या पाण्याच लेकीच्या आलिशान लग्नाचं स्वप्न आणि आमचे अश्रू वाहून गेले. पण एक कळलं मी पणा हा निसर्गापुढे कधीच टिकत नाही. आमचाही मी पणा टिकला नाही. निसर्गापुढे कोणी नाही. आम्ही आता थेट मोहसीनचे वडिल फारुक काझी यांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानणार असल्याचं संस्कृतीच्या आईने सांगितलं.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jagtap Family On Vaishnavi Hagawane Death : हगवणेंच्या दुसऱ्या सूनेचीही हादरवणारी कहाणी, वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण, मयूरीच्या भावाने CCTV दाखवला!

 

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
विनयभंग करणारा तरुण निघाला MPSC चा विद्यार्थी, 24 तासाच्या आतच शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
विनयभंग करणारा तरुण निघाला MPSC चा विद्यार्थी, 24 तासाच्या आतच शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Pune Petrol Diesel gas shortage: घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup Prize Money: T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
भारत -न्यूझीलंड T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
Embed widget