पुणे : पुण्यातील (Pune) कोथरुड येथील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात जैन ट्रस्ट (jain) आणि गोखले बिल्डर यांच्यात झालेला जमीन व्यवहार अखेर रद्द करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी जमीन गैरव्यवहारप्रकरणावरुन मंत्री मुरलीधर मोहोळ(Murlidhar mohol) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. आज गोखले बिल्डर्सकडून हा जमीन व्यवहार रद्द करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार, गोखले बिल्डर्सने माघार घेताच आता, धर्मादाय आयुक्त यांनी जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. गोखले बिल्डर्स आणि जैन बोर्डिंग ट्रस्ट यांच्यात कोथरुड येथील जागेसंदर्भात मोठा आर्थिक व्यवहार झाला होता. शिवसेना नेते तथा माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी याप्रकरणी केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टपणे भाष्य केलं आहे. 

Continues below advertisement

Murlidhar Mohol: मला यात का ओढलं याचं कारण मी वेळ आल्यानंतर नक्की सांगेन

यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, मी जो शब्द दिलेला होता तो शब्द पाळला आहे, माझ्यावरती या प्रकरणी विनाकारण आरोप झाले. या प्रकरणात काही लोकांनी नको ते स्वार्थ साधून घेतले, माझं नाव का घेतलं? मला यात का ओढलं याचं कारण मी वेळ आल्यानंतर नक्की सांगेन, त्याचबरोबर पहिल्या दिवसांपासून आत्तापर्यंत काय घडलं याती इंत्यभूत माहिती मी वेळ आल्यावरती देईन असं म्हणत मोहोळ यांनी अप्रत्यक्षपणे रविंद्र धंगेकरांना इशारा दिला आहे.

Murlidhar Mohol: नाव न घेता धंगेकरांना केलं लक्ष्य

‘मी जैन समाजासोबत आहे आणि जैन समाज माझ्यासोबत’, असं मी सुरुवातीपासून सांगत होतो. कारण माझं समाजासोबत असलेलं नातं, हे आजचं नाही, तर गेल्या ३० वर्षांचं आहे. या विषयात पुण्यातील जैन समाजातील कोणत्याही व्यक्तिने माझ्यावर अविश्वास दाखवत वैयक्तिक आरोप केला नाही. परंतु काही राजकारण्यांनी स्वार्थासाठी हेतुपुरस्कर माझ्यावर खोटेनाटे आरोप करत बदमानी करण्याचा प्रयत्न केला. तरीही माझ्या आणि समाजातील नात्याला तडा जाण्याची अजिबातच शक्यता नव्हती. अशा प्रकारे जैन समाज बांधवांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल समाजाचा मी सदैव ऋणी राहील असे मोहोळ यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर नाव न घेता धंगेकरांना लक्ष्य केलं आहे.

Continues below advertisement

Murlidhar Mohol:  मुरलीधर मोहोळांची पोस्ट चर्चेत

जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात जैन ट्रस्ट (jain) आणि गोखले बिल्डर यांच्यात झालेला जमीन व्यवहार अखेर रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "होय, जैन समाजाच्या मनाप्रमाणेच निर्णय; धन्यवाद, मा. देवेंद्रजी ! ‘जैन समाजाच्या मनात जे आहे, तेच होईल’ हा भगवान महावीर यांच्यासमोर दिलेला शब्द आज धर्मादाय आयुक्तांच्या HND बोर्डिंगच्या निकालाने पूर्णत्वास गेला आहे. या सर्व प्रतिक्रियेत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. बोर्डिंगचा हा व्यवहार दोन्ही बाजूनं रद्द केल्यानं जैन समाजाच्या मनात जे होतं, तेच आज घडलं, तेसुद्धा आपण शब्द दिलेल्या १ तारखेच्या आधीच !"

"आचार्य गुरूवर्य गुप्तीनंद जी महाराज यांनी या प्रकरणी बोर्डिंगला भेट देण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर प्रतिसाद देत मी स्वतः बोर्डिंगला भेट देत भगवान महावीर आणि आचार्य गुरूवर्य गुप्तीनंद जी महाराज यांचं मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. त्याचवेळी समाज बांधवांशी संवाद साधताना माझी भूमिका स्पष्ट करत समाजाच्या मनात जे आहे, तसाच निर्णय घेतला जाईल, हा शब्द महाराजजींसमोर दिला होता. शिवाय महाराजजींनी १ नोव्हेंबर, २०२५ पासून आमरण उपोषणाची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर १ तारखेच्या आतच हा विषय संपवला जाईल, असं समाजाला सांगितलं होतं ! या पार्श्वभूमीवर मा. देवेंद्रजी आणि या संबंधित विविध घटकांशी हा व्यवहार रद्द व्हावा, यासाठी मी सातत्याने संवाद साधत प्रामाणिक प्रयत्न केले, ज्याला आजच निकालाने यश आले."

"मी जैन समाजासोबत आहे आणि जैन समाज माझ्यासोबत', असं मी सुरुवातीपासून सांगत होतो. कारण माझं समाजासोबत असलेलं नातं, हे आजचं नाही, तर गेल्या ३० वर्षांचं आहे. या विषयात पुण्यातील जैन समाजातील कोणत्याही व्यक्तिने माझ्यावर अविश्वास दाखवत वैयक्तिक आरोप केला नाही. परंतु काही राजकारण्यांनी स्वार्थासाठी हेतुपुरस्कर माझ्यावर खोटेनाटे आरोप करत बदमानी करण्याचा प्रयत्न केला. तरीही माझ्या आणि समाजातील नात्याला तडा जाण्याची अजिबातच शक्यता नव्हती. अशा प्रकारे जैन समाज बांधवांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल समाजाचा मी सदैव ऋणी राहील ! जय जिनेंद्र !!!"