Mumbai Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक अखेर 32 तासांनंतर पूर्ववत (Mumbai Pune Expressway Traffic) झाली आहे. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांमधल्या वाहतुकीचा वेग वाढावा म्हणून नव्वदच्या दशकात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बांधण्यात आला होता. त्या एक्स्प्रेस वेच्या वेगाला एका अपघातानं ब्रेक लागला होता. अखेर 32 तासांनंतर मध्यरात्री 2 वाजता पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक  पूर्ववत झाली. 

Continues below advertisement

आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील, प्रोपलीन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला आणि मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक तात्काळ ठप्प झाली होती. दुर्घटनाग्रस्त टँकरमधील गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आला आणि अपघातग्रस्त टँकर क्रेनच्या सहाय्यानं बाजूला करण्यात आला. अपघातग्रस्त टँकर रस्त्याच्या बाजूला करुन मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरची (Mumbai Pune Expressway) वाहतूक सुरळीत करण्यात आली.

ट्रक बंद पडल्यानं आणि चालक झोपी गेल्यानं वाहनांच्या रांगा- (Mumbai Pune Expressway Traffic)

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील गॅसचा टँकर 32 तासांनी हटवण्यात आला. त्यानंतर मुंबईकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पण मळवली जवळ एक ट्रक बंद पडला आहे. तसेच अनेक अवजड वाहनांचे चालक झोपी गेल्यानं कामशेत जवळ वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. आता महामार्ग पोलीस झोपी गेलेल्या वाहन चालकांना उठवून गाड्या पुढं काढण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळं आडोशी बोगड्याजवळ वाहतूक सुरळीत असली तरी प्रवाशांना काहीवेळ ताटकळत बसावे लागले आहे.

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीसांनी वाहतूककोंडीची घेतली दखल- (Mumbai Pune Expressway Traffic)

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. भविष्यात अशी घटना घडू नये आणि घडल्यास आणखी कोणत्या प्रकारची सज्जता असावी, याबाबत चौकशी करुन शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गंभीर दखल घेतली आहे. आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिली आहे. सोबतच मिसिंग लिंकचे कामही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. 

एक्स्प्रेस-वेवर कोंडीबाबत एबीपी माझाचे सवाल- (ABP Majha On Mumbai Pune Expressway)

  1. निवडणुकीत दिसणारी नेत्यांची तत्परता लोकांची समस्या सोडवताना का दिसत नाही?
  2. एक्स्प्रेस-वेवर टोल वसूल करणाऱ्या आयआरबीने मदतीसाठी काय प्रयत्न केले?
  3. वाहतूक कोंडीबाबत जबाबदार मंत्री एकनाथ शिंदे स्वत:हून का पुढे आले नाहीत?
  4. एखाद्या घटनेवर तात्काळ उपाययोजना करणारी यंत्रणा आपल्याकडे नाही का?
  5. प्रवाशांना झालेला मनस्ताप आणि नुकसान कसं भरून निघणार?

संबंधित बातमी:

Mumbai Pune Expressway : मोठी बातमी! पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे महामार्गावरची वाहतूक अखेर सुरळीत; तब्बल 32 तासांच्या प्रयत्नानंतर गॅस टँकर हटवण्यात यश