लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात मिसिंग लिंक (Mumbai-Pune Expressway Missing Link) प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’चा लोकार्पण सोहळा काल मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर आता सर्वत्र वाहतूक सुरळीत झाल्याचे दिसून येत आहे, मुंबईवरून पुण्याला जाणारी मिसिंग लिंकची लेन सुरू असून वाहतूकही व्यवस्थित पार पडताना दिसत आहे, पण दुसरीकडे पुण्यावरून मुंबईला येणारी मिसिंग लिंकची (Mumbai-Pune Expressway Missing Link) लेन सध्या बंद असल्याचं समोर आलं आहे, आणखी दोन ते तीन दिवसांनंतर ही लेन सुरू होईल अशी माहिती समोर आली आहे.(Mumbai-Pune Expressway Missing Link)

Mumbai-Pune Expressway Missing Link :  मार्गिका बंद असल्याने लोकांवर जुन्या मार्गाने जाण्याची वेळ

मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवरील लोणावळा घाटातील मिसिंग लिंक काल सुरू झाली असली तरी अद्याप पुणे वरून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद आहे. पुणे ते मुंबई जाणारी मार्गिका बंद असल्याने लोकांवर जुन्या मार्गाने जाण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. मिसिंग लिंकचा वापर करता येत नसल्याने वाहनधारक नाराज असल्याचे दिसून येत आहे. पुणे ते मुंबई मार्गिका बंद असल्याची सुचना वाहतूक पोलीसांकडून दिली जात आहे, यासंदर्भामध्ये माहिती घेतला असता अजून दोन ते तीन दिवस लागतील अशा प्रकारची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे, पुण्यावरून मुंबईला येणाऱ्या मार्गीकेवरील काही काम अद्याप बाकी आहे, त्यामुळेच दोन-तीन दिवसानंतर पुण्यावरून मुंबईला जाणारी मिसिंग लिंक सुरू होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Mumbai-Pune Expressway Missing Link : पुण्यावरून मुंबईला येणारी बंद 

काल मी सिंगलिंगच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पुण्याकडे जाणारी कनेक्टिंग लिंक सुरू करण्यात आली होती. कार्यक्रमाचे स्टेज असल्यामुळे पुणे ते मुंबई लेन काही काळासाठी बंद होती, मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती लोणावळा घाटात आज वाहतूक कोंडी नाहीये, काल वाहन चालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता, आज सकाळी पासून वाहतूक सुरळीत सुरू आहे. त्याचबरोबर मिसिंक लिंक वरती मुंबई ते पुणे मार्गावर जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे, मात्र पुण्यावरून मुंबईला येणारी बंद होती. 

Mumbai-Pune Expressway Missing Link : पुण्यावरून मुंबईला येणाऱ्या मार्गीकेवरील काही काम अद्याप बाकी 

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती काल लोणावळा घाटामध्ये मिसिंग लिंकचे उद्घाटन करण्यात आले, या उद्घाटनाच्या वेळेस काल प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र आज कसलीही वाहतूक कोंडी नाही. सकाळपासून वाहतूक सुरळीतपणे चालू आहे, मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या लेन वरून वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे, पण पुण्यावरून मुंबईला येणारी लेन आहे. ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही, यासंदर्भामध्ये माहिती घेतला असता अजून दोन ते तीन दिवस लागतील अशा प्रकारची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे, पुण्यावरून मुंबईला येणाऱ्या मार्गीकेवरील काही काम अद्याप बाकी आहे, त्यामुळेच दोन-तीन दिवसानंतर पुण्यावरून मुंबईला जाणारी मिसिंग लिंक सुरू होईल, अशी माहिती समोर आली आहे.

Mumbai-Pune Expressway Missing Link : पुणे-मुंबई मिसिंक लिंक बंदचं, आजचं खुला करणार MSRDC चा दावा

मिसिंक लिंकचं लोकार्पण झालं तरी पुण्याहून मुंबईकडे जाणारी मार्गिका अद्याप बंद आहे. पेंडॉल काढायचं काम सुरु आहे आणि ते काही वेळात पूर्ण करुन आजचं मार्ग खुला करु, असा दावा msrdc ने केलाय.