पुणे: पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे, एका जन्मदात्या आईनेच आपल्या दोन चिमुकल्या बाळांचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून लग्नाच्या 10 वर्षानंतर घरात जुळे बाळ जन्मलेल्या बाळांना आईनेच पाण्याच्या टाकीत बुडवून त्या निष्पाप जिवांची हत्या केली आहे. टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून लग्नाच्या 10 वर्षानंतर घरात जुळे बाळांनी पोटी जन्म घेतला. मात्र, बाळाची वाढ होत नसल्याने आणि उपचाराचा खर्च परवडत नसल्याने पाणीच्या टाकीत दोन लहान मुलांना संपवलं. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

चिमुकल्यांना पाण्यात बुडवून मारल्यानंतर आईनेही स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रतिभा मोहिते असं आईच नाव आहे.   लोणी काळभोर पोलिसांनी आईला अटक केली आहे. 8 तारखेला ही घटना घडली आहे. महिलेच्या भावानेच पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे. पैशामुळे वेळेत उपचार मिळाले नाही ही दिनानाथ रुगणलायाची घटना ताजी असतानाच पुण्यातून आता टेस्ट ट्यूबच्या मध्यामधून लग्नाच्या 10 वर्षानंतर जन्मलेल्या जुळ्या बाळांना उचारासाठी पैसे नसल्याने बाळांना संपवल्याची घटना घडली या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जन्मलेल्या मुलांची योग्य वाढ होत नव्हती. त्यामुळे त्यांचा उचारासाठी खूप खर्च येत होता, हा खर्च परवडत नसल्याने घरात तणाव वाढला या ताणावावरून आईने मुलांनाच संपवण्याचं आणि आपलंही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी दोन्ही बाळांना घेऊन आई घराच्या छतावर गेली त्यानंतर दोन्ही मुलांना छतावरील पाण्याच्या टाकीत बुडवलं आणि त्यानंतर स्वतःही त्याच पाण्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार समोरच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्याने बघितला आणि महिलेच्या भावाला याची माहिती दिली. सगळे जमेपर्यंत दोन्ही बाळांनी जीव सोडला होता. त्यानंतर भावाने थेट पोलिसांत या प्रकरणाची तक्रार केली. याप्रकरणी महिलेवर खून केल्याचा गुन्हा दाखल करुन महिलेला अटक करण्यात आली आहे.

 लग्नाच्या जवळपास 10 वर्षांनी उपचारानंतर घरात बाळ

लग्नाच्या जवळपास 10 वर्षांनी उपचारानंतर घरात टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून चिमुकल्या जुळ्यांचे हसणे-रडणे ऐकायला मिळाले. इतके सगळे करूनही चिमुकल्यांची वाढच होत नाही आणि उपचाराचा खर्चही परवडत नाही म्हणून दहा वर्षे मातृत्वासाठी आतुर असलेल्या मायला परिस्थितीने अचानक कैदाशीण बनवले. पोटच्या दोन महिन्यांच्या जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवून मारले आणि स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. 8) सकाळी पावणेसातच्या सुमारास महिलेच्या माहेरी थेऊरमधील दत्तनगर भागातील काकडे वस्तीत घडली आहे. याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी प्रतिभा हेमंतकुमार मोहिते (35, रा. मीरजवाडी, आष्टा, जि. सांगली) या महिलेला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिलेच्या भावानेच फिर्याद दिली आहे. 10 वर्षे लग्नाला झाले तरी मूल होत नसल्याने टेस्ट ट्यूब बेबीचा पर्याय निवडला. यातून दोन महिन्यांपूर्वी जुळे मुले झाली; परंतु त्यांची वाढ होत नव्हती. महिलाही खूप अशक्त झाल्याने तिला काही आजार जडले.