पिंपरी : पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे, अशातच महापालिका निवडणुकीमध्ये (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) उभारलेल्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांतून सर्वच शहरातील कोट्यधीश उमेदवारांची नावे समोर आलेली आहेत. यामध्ये प्रभाग क्र. २१ मधील राष्ट्रवादी (अजित पवार) चे उमेदवार संदीप वाघेरे याच्याकडे ३७० कोटींहून अधिक मालमत्ता असल्याचंं समोर आलं आहे, त्यामुळे संदीप वाघेरे हे पिंपरी चिंचवड शहरातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या नंतर याच पक्षाचे प्रभाग क्र. २० मधील उमेदवार योगेश बहल १९३ कोटींच्या  मालमत्तेसह कोट्यधीश उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या नंबरवरती आले आहेत.(Pimpri-Chinchwad Municipal Corporation)

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार संदीप वाघेरे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, ३७० कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे. त्यांच्यासह पत्नीकडे मिळून १६९९ ग्रॅम सोने आणि ३७०० ग्रॅम चांदीचे दागिने आहेत. प्रभाग क्र. २० मधील याच पक्षाचे योगेश बहल यांच्या प्रतिज्ञापत्रात १९३ कोटींची मालमत्ता नमूद आहे. त्यांच्या स्वतःच्या नावे मर्सिडीज बेंज, मुलीच्या नावे रेंज रोव्हर आणि मर्सिडीज-जी, तर मुलाच्या नावे मॉरिस गॅरेज अशा महागड्या कार आहेत.(Pimpri-Chinchwad Municipal Corporation)

Pimpri-Chinchwad Municipal Corporation: भाजपचे श्रीमंत उमेदवार कोण?

भाजपच्या पिंपळे सौदागर रहाटणी प्रभाग क्र. २८ मधील कुंदा भिसे या देखील श्रीमंत उमेदवारांच्या यादीत आलेल्या आहेत. त्यांच्याकडे १०४ कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. भाजपचे दुसरे उमेदवार शत्रुघ्न काटे यांच्याकडे ५८ कोटींची मालमत्ता आहे, तर याच प्रभागातील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार शीतल काटे यांच्याकडे १४ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ४०० ग्रॅम सोने व ५०० ग्रॅम चांदी असल्याची नोंद आहे. राम वाकडकर यांच्या प्रतिज्ञापत्रात ५० कोटींची मालमत्ता नमूद आहे.

Continues below advertisement

तर वाकड-पुनावळे प्रभाग क्र. २५ मधील भाजपच्या उमेदवार रेश्मा भुजबळ यांच्याकडे ५७ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्या पतीच्या नावे रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ, फॉर्च्यूनर लिजेंडर अशा अलिशान मोटारी आहेत. तर पिंपळे निलख-विशालनगर प्रभाग क्र. २६ मधील भाजपच्या उमेदवार स्नेहा कलाटे यांनी ३५ कोटींची मालमत्ता जाहीर केली आहे. 

Pimpri-Chinchwad Municipal Corporation: खासदारपुत्रांकडे २९ कोटींची मालमत्ता अन् महागडी वाहनं

थेरगाव-दत्तनगर प्रभाग क्र. २४ मधून शिवसेनेचे उमेदवार विश्वजीत बारणे यांची २९ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्या नावे लेक्सस एलएक्स ६०० व फॉर्च्यूनर या आलिशान मोटारींची नोंद आहे. ते खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र आहेत. वाकड-पुनावळे प्रभाग क्र. २५ मधील भाजपचे उमेदवार राहुल कलाटे यांच्याकडे ७३ कोटींची मालमत्ता आहे.