एक्स्प्लोर

Mahesh Landge : धरणात पाणी नाही तर काय करू? असं आम्ही कधीच म्हटलं नाही; महेश लांडगेंनी अजितदादांच्या जखमेवरची खपली काढली

Ajit Pawar Vs Mahesh Landge : लोकसभेत आढळराव पाटील घड्याळाच्या चिन्हावर उभे होते, त्यावेळेस अजित पवारांनी आपलं कौतुक केलं होतं. म्हणजे यांचं काम असेल तर चांलगा, नाहीतर वाईट असं म्हणत महेश लांडगेंनी टीका केली.

पुणे : महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला असला तरी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी काही संपण्याचं नाव घेत नाहीत. अजित पवारांनी भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर लांडगेंनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्राच्या दादाला गल्लीबोळात फिरायला लागतंय असा टोला त्यांनी लगावला. तसेच धरणात पाणी नाही म्हटल्यावर अजित पवार शेतकऱ्यांना काय म्हटले होते? आम्ही लोकांना तसं कधीच म्हटलं नाही असं सांगत लांडगेंनी दादांच्या जुन्या जखमेची खपली काढली.

अजित पवारांनी योग्यवेळी पालकत्व स्वीकारलं असतं तर आज उत्तरदायित्व मागायची वेळ आली नसती. तुम्ही काहीही आरोप कराल आणि आम्ही सहन करणार असं होणार नाही. त्यांनी वैयक्तिक टीका का केली ते मला कळत नाही. राजकारण करत असताना अनेक लोक सरेंडर होतात, पण मी स्वाभिमानी आहे. मी जेव्हापासून त्यांना सोडलं तेव्हापासून त्यांच्याकडे एकही काम घेऊन गेलो नाही असं महेश लांडगे म्हणाले.

मी आमच्या लोकांच्या समस्या ओळखतो. काल काही लोकांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आम्ही पाणी आणलं, पाइपलाईन केली. पण पवना जलवाहिनी का बंद झाली याबाबत का चौकशी केली नाही?

याच महाराष्ट्राच्या दादांनी शेतकऱ्यांना त्यावेळी उत्तर दिलं होतं की धरणात पाणी नाही तर काय करू? आम्ही कधी असं लोकांना म्हटलं नाही की धरणात पाणी नाही तर आम्ही काय करू? पाण्यासाठी आम्ही शहरात सगळी कामं केली आहेत. आम्ही 5 वर्षात काय केलं हेच सांगत आहोत असं म्हणत महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्या जाहीरनाम्यावर टीका केली.

कामाच्या आधारे मतं मागतोय

महेश लांडगे म्हणाले की, "आमच्या जाहिरनाम्याबद्दल दिशाभूल करण्याचे काम विरोधक करत आहेत. आमची आश्वासनं पूर्ण करणं शक्य नाही, ती अवास्तव आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण आमची आश्वासनं व्यवहार्य आहेत. आम्ही घेतलेले निर्णय घाईने घेतलेले नाहीत. आम्ही लोकांमधे जाऊन सर्वेक्षण केलंय, लोकांची मतं जाणून घेतली आहेत आणि मगच हा निर्णय घेतला आहे."

आपली महापालिका ही पूर्ण राज्यात चर्चेची झाली, ही चर्चा का झाली, कुणामुळं झाली सगळ्यांना माहिती आहे. 2017 मध्ये बहुमताने भाजप निवडून आली. त्यानंतर आपल्या शहराला गती देण्याचं काम आम्ही केलं. देवेंद्र फडणवीस याचं मार्गदर्शन आम्हाला होतं. राज्यातल्या सगळ्या नेत्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. राज्य सरकारच्या योजना आम्ही पूर्णपणे शहरात राबविल्या. याच आधारावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत असं महेश लांडगे म्हणाले.

महाराष्ट्राच्या दादाला गल्लीबोळात फिरावं लागतंय

अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर महेश लांडगे म्हणाले की, "निवडणुकीत आरोप होत असतात, मी कुठल्याही निवडणुकीत कुणावर आरोप केले नाहीत अथवा उत्तर दिलं नाही. मी जनसेवेची कामं केली, लोकांनी ते स्वीकारलं. कुणाची बदनामी न करता जर कुणी पुढं जात असेल तर लोक त्यांना विरोध करतात. पण मला बदनाम केलं जात आहे. ही सगळी चर्चा फक्त पिंपरी चिंचवडमध्ये मर्यादित नाही, महाराष्ट्राचा दादा आणि गल्लीबोळातला दादा अशी लढाई त्यांनी निर्माण केली."

आरोपांवर पुरावे नाहीत

मी परत सांगतो कुठलाही आरोप करताना त्याला पुरावा असावा लागतो. अजित पवारांनी आरोप केलेत पण त्यांच्याकडे पुरावा नाही. मी पण आरोप करू शकतो. माझ्यावर काहीही आरोप करू द्या, मी लक्ष देत नाहीत. निवडणूक आली की आरोप होतात असं महेश लांडगे म्हणाले.

अजित पवार स्वार्थी राजकारणी

लोकसभेत आढळराव पाटील घड्याळाच्या चिन्हावर उभे होते. त्यावेळेस महेश लांडगे यांचे गुणगान त्यांनी गायले. म्हणजे तुमचं काम असले की महेश लांडगे चांगला, नाहीतर वाईट. परत ही जागा लोकसभेला त्यांना गेली तर परत माझ्याकडे येतील आणि महेश चांगला आहे असं म्हणतील. अजित पवार स्वार्थी राजकारणी आहेत असा आरोप लांडगे यांनी केला.

महेश लांडगे म्हणाले की, "काय बोलाव आता महाराष्ट्राच्या दादाला? 100, 200 लोकांमध्ये सभा घ्यायला लागले आहेत, हे म्हणजे महाराष्ट्राच्या दादासाठी, त्यांच्या प्रतिष्ठेसाठी चांगल नाही असा टोला महेश लांडगे यांनी लगावला. माझ्या भावावर त्यांनी टीका केली, मग पार्थ पवार ऐवजी स्वार्थ पवार म्हणावं का? 1800 कोटी रुपयांचे आरोप तुमच्या मुलावर झाले आणि वडील म्हणतात की मला माहिती नाही. खालच्या दर्जाला जाऊन आरोप करणं हे महाराष्ट्राच्या दादाला शोभत नाही."

राजकारणाच्या मर्यादा सांभाळण्याचं काम मीच ठरवलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचाच महापौर होणार, आमचं बहुमत येणार. माझी मान मजबूत आहे, त्यामुळे बुद्धी आणि शक्ती पैलवानकडे असते. पुढचा माणूस काय डाव टाकणार आहे आणि त्याला कसं चित्रपट करायचं हे आमच्या रक्तात असतं. राजकीय डावपेच करतात म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली आहे. गल्लोगल्लीत त्यांना सभा घ्यावी लागली. ही परिस्थिती त्यांच्यावर कशामुळे आली हे त्यांचं आत्मचिंतन करावं असं म्हणत महेश लांडगे यांनी अजित पवारांना टोला लगावला.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Smita Jadhav: तरुणांचे स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट आणि तरुणांसाठी काम करण्याची संधी मला मिळेल; स्मिता जाधवांनी व्यक्त केला विश्वास
तरुणांचे स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट आणि तरुणांसाठी काम करण्याची संधी मला मिळेल; स्मिता जाधवांनी व्यक्त केला विश्वास
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
Embed widget