Pune Weather :  पुणेकरांची येत्या काही दिवसांतही उन्हापासून सुटका होणार नसल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पुढील तीन ते चार दिवस पुण्यात तापमान उच्चांक गाठेल आणि 41 अंश सेल्शिअसच्या वर तापमानाचा पारा असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे येत्या आठवड्यात पुणेकरांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागू शकतो. 

मागील काही दिवसांपासून पुण्यात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पुणेकर चांगलेच  हैराण झाले आहे. या वाढत्या उन्हामुळे पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. आवश्यक काम नसल्यास दुपारी पुणेकरांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन हवामान खात्याने पुणेकरांना केलं आहे. शनिवार जिल्ह्यातील शिरूर सर्वात उष्ण ठिकाण होते. तेथे 42 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. तर मगरपट्टा, लवळे आणि कोरेगावचे तापमान 40 अंश सेल्सिअसहून अधिक होते.  लोणावळामध्ये 34.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. अन्य सर्व ठिकाणी तापमान 35 ते 40 अंश सेल्सियस होतं तर आज (21 मे) जिल्ह्यात तळेगाव ढमठेरे आणि शिरुरमध्य़े सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. ढमढेरे परिसरात 41.3 अंश सेल्सियस तर शिरुरमध्ये 41.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. 

26  मे पर्यंत पारा 41 अंशापर्यंत राहणार

दक्षिण-पश्चिम मान्सून शुक्रवारी निकोबार बेटावर दाखल झाला आहे. आयएमडीने 4 जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर मान्सून पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. हवेत प्रमाणापेक्षा अधिक आर्द्रता असल्याने रात्रीचे तापमान वाढले आहे. हवामान विभागानुसार पुणे जिल्हा व परिसरातील तापमान 26 मेपर्यंत पारा 40 ते 41अंशा दरम्यान राहणार आहे. किमान तापमान 24 ते 26 डिग्री सेल्सिअस राहील, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे. 

भरपूर पाणी पिण्याचं आवाहन...

याच काही दिवसात सर्व पुणेकरांना हायड्रेट राहण्याचं आवाहन केलं आहे. भरपूर पाणी पिण्याचा सल्लादेखील दिला आहे आणि दुपारी कामाव्यतीरिक्त घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.  

कोणत्या परिसरात किती तापमान?

शिरुर- 41.5 हडपसर-39.1ढमढेरे- 41.3 चिंचवड- 38.9पुरंदर- 40.8 शिवाजी नगर-38.8एनडीए- 38.8आंबेगाव-40.3नारायणगाव- 38.1 राजगुरुनगर- 40.2 पाषाण-38.0मगरपट्टा- 40.1 हवेली-37.5वडगावशेरी-40.0 तळेगाव-37.5कोरेगाव पार्क-39.8 गिरीवन-37.0बारामती-39.8

 

उन्हात जाताना कोणती काळजी घ्याल?

-फार महत्वाचं काम नसल्यास घराबाहेर पडू नये.- कापडी स्कार्फ बांधूनच घराच्या बाहेर पडा.- पुरेसं पाणी पीत रहा.- सुती कपड्यांचा वापर करा- उन्हातून घरी आल्यावर लगेच पाणी पिऊ नका.- उपाशीपोटी घराबाहेर पडू नका- तळलेले आणि तुपकट पदार्थ टाळा.- गॉगल, टोपी, रुमाल, छत्री यांचा वापर करा.