पिंपरी चिंचवड:  वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं तर तुमचं लायसन्स थेट तीन महिन्यांसाठी सस्पेंड केलं जाणार आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी अशा साडेसहाशेहून अधिक लायसन्स सस्पेंड करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव दिलेत. त्यातील 195 लायसेन्स सस्पेंडही झालेत. अशी कारवाई झाल्यावर संबंधित चालकांना लायसन्ससाठी नव्यानं प्रक्रिया राबवावी लागणार आहे. कारवाई झालेल्या चालकाने नव्यानं लायसन्स न काढता वाहन चालवल्यास दहा हजारांचा दंड आकारला जाणार आहे. 


पुणे आणि पिंपरी - चिंचवड शहरात  नागरिकांकडून परिवहन विभागाच्या वाहतूकीच्या नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जातं. रस्त्याच्या चुकीच्या बाजूने गाडी चालवणे, नो एन्ट्रीमध्ये गाडी चालवणे, सिग्नल तोडणे,  गर्दी असताना फुटपाथवरून गाडी चालवणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.  त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात बरीच वाढ झाल्याचं दिसून येतंय. त्याला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने निर्णय घेतला  आहे.


वाहतूक पोलीस अधिक्षक विठ्ठल कुबडे यांनी  सांगितले की,   बेशिस्त वाहने चालवणाऱ्यांना आता चाप बसवण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबली आहे. चालू वर्षात 660 लायसन्स रद्द करण्याचे प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठवले आहेत. त्यापैकी 194 वाहन परवाने रद्द करण्यात आले आहे. उर्वरित परवाने देखील लवकरात लवकर रद्द करण्यात येणार आहे. 


वाहन परवाना  रद्द झाल्यास वाहन चालवल्यास कोणती कारवाई होणार?


वाहन परवाना  रद्द झाल्यास वाहन चालकाने तीन महिने वाहन चालवता येणार नाही.  कारवाई झालेल्या चालकाने नव्यानं लायसन्स न काढता वाहन चालवल्यास 10 हजारांचा दंड आकारला जाणार आहे. वाहन चालकाल वाहन रद्द झाल्यास वाहन चालकाला पूर्वीप्रमाणे प्रक्रिया कर परवाना काढावा लागणार आहे. 


दारू पिऊन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे,इतर नियम तोडल्यास वाहनचालकावर परवाना निलंबित होण्याची कारवाई होऊ शकते.वाहतुकीला शिस्त लावायची असेल तर वाहनचालकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. वाहतूक शाखेतर्फे वेळोवेळी नियमांची जनजागृती केली जाते. पण दरवेळी नियमांचे उल्लंघन झाल्याचे चित्र शहरात दिसते. त्यामुळे  कठोर कारावाई करण्याचा निर्णय घेतला आहे.