Pune Power Supply : ऐन उन्हाळ्यात पुण्यात 'या' भागात 10 तास बत्ती गुल्ल; रात्री 9 वाजता वीजपुरवठा सुरळीत होणार
Pune News : पुण्यात एकीकडे नागरिक उन्हामुळे हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे पुण्यातील काही परिसरात तब्बल 10 तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

No power supply : पुण्यात एकीकडे नागरिक उन्हामुळे हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे पुण्यातील काही परिसरात तब्बल 10 तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (महा पारेषण) ने आज पुण्यातील अनेक भागात वीज कपात जाहीर केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे, सिंहगड रोड, नांदेड शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा आज सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत बंद राहणार आहे.
पॉवर युटिलिटी या भागात काही देखभाल आणि दुरुस्तीची कामं करत आहे. त्यामुळे त्यांनी एक दिवस वीज खंडित करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा केल्यावर अनेक पुणेकरांनी काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील तापमान आधीच वाढलेले असताना देखभालीचे काम हाती घेतल्याबद्दल रहिवाशांनी पॉवर युटिलिटीला दोष दिला आहे.
शहरातील या भागात वीज पुरवठा खंडित
नांदेड सिटी, नऱ्हे गाव, जेएसपीएमएस कॉलेज, झील कॉलेज, अभिनव कॉलेज, स्वामी नारायण मंदिर, प्रभात प्रेस या ठिकाणी वीज पुरवठा खंडित केला गेला आहे. त्यासोबतच पोतदार शाळा, भारती विद्यापीठ, बाफना ऑटो, त्रिमूर्ती चौक तुकाई नगर, तुकाईनगर वॉटर वर्क्स, अभिरुची उपकेंद्र, सिंहगड कॉलेज, वडगाव, भिडे बाग, राजयोग सोसायटी, लगड मळा, माणिकबाग, नांदेड फाटा ते धायरी पूल, धायरी औद्योगिक क्षेत्र, वांजळे पूल, प्रयेजा सोसायटी, सनसिटी, वडगाव, फनटाईम सोसायटी, हिंगणे गाव, झगडे गोठा या परिसरात देखील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
पुणेकर संतापले...
तब्बल 10 तास वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने पुणेकरांची चांगलीच गौरसोय होणार आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यातील तापमानाचा पारा वाढत आहे. रात्री पाऊस किंवा गारठा आणि दुपारी कडाक्याचं जाणवत आहे. त्यामुळे अधिच पुणेकर (Pune Electricity News) हैराण झाले आहे आणि त्यातच आता 10 तास वीजपुरवठा खंडित केल्याने पुणेकरांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.
सहकार्य करण्याचं आवाहन...
पुण्यातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने पुणेकरांची गैरसोय होणार आहे. त्यामुळेच महापारेषण कडून दिलगिरी व्यक्त केली जात आहे. त्यासोबतच नागरिकांनी याला प्रतिसाद द्यावा, असं त्यांची नागरिकांना आवाहन केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
