Kasba Bypoll Election : मी नामनिर्देश पत्र भरून ठेवलंय. भाजप मलाच उमेदवारी देईल देणार अशी खात्री मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक(shailesh Tilak ) यांनी व्यक्त केली होती. (kasba bypoll Election) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी काल (3 फेब्रुवारी) रात्री उशीरा केसरी वाड्यात जाऊन शैलेश टिळकांची भेट घेतली होती. त्यानंतर शैलेश टिळकांनी उमेदवारी मिळणार असल्याची खात्री व्यक्त केली होती. मात्र अचानक कसब्यातून भाजपच्या उमेदवारीसाठी हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा केली आहे.
शैलेश टिळक म्हणाले की, मुक्ता टिळकांच्या निधनानंतर पोटनिवणडूक जाहीर झाल्यावर आम्ही घरात उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. कारण मुक्ता टिळकांच्या अकाली जाण्याने त्यांची अनेक कामं अर्धवट राहिली आहेत. त्यांनी सुरू केलेल्या योजना होत्या. त्या पूर्ण करण्यासाठी घरातील व्यक्तीला उमेदवारी मिळावी, असं आम्ही म्हटलं होतं. त्यासाठी आम्ही पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. मात्र फक्त देवेंद्र फडणवीसांची भेट राहिली होती. ती भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसच घरी आले होते, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
ते पुढे म्हणाले होते की, मुक्ता टिळकांच्या निधनानंतर ते अंत्यसंस्कारानंतर घरी आले नव्हते. त्यामुळे ते भेटीसाठी घरी आले असावेत, असा अंदाज शैलेश टिळकांनी व्यक्त केला होता. पोटनिवडणुकीसंदर्भात त्यांनी स्पष्ट संकेत दिले नाहीत. सर्व दृष्टीने विचार करुन आम्ही काही नावं वर पाठवली आहेत. त्यावर दिल्लीवरुन यासंदर्भात निर्णय होईल, अशा चर्चा देवेंद्र फडणवीसांशी झाली असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
... म्हणून उमेदवारी अर्ज भरुन ठेवलाय
पोटनिवडणुकीची तयारी म्हणून उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यासाठी लागत असणारे कागदपत्र आणि उमेदवारी अर्जाचा योग्य अभ्यास करण्यासाठी लवकर घेतला. त्यामुळे उमेदवारी आम्हालाच मिळेल असा त्याचा अर्थ होत नसल्याचंही ते म्हणाले होते. साधारण जेव्हा एखाद्याचं निधन होतं तेव्हा त्याच्या घरातील व्यक्तीचा उमेदवारीसाठी विचार केला जातो. त्यामुळे परंपरेनुसार असाच विचार यावेळीदेखील होईल असं वाटत असल्याचं ते म्हणाले होते. आमच्या कुटुंबातील कोणाला उमेदवारी दिली नाही तर पक्षाच्या आदेशाचं आम्ही पालन करू, असं स्पष्ट केलं होतं.
प्रदेश प्रवक्ता पद दिल्यानं समाधानी
कुणाल टिळक यांनी भाजप प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते म्हणाले की माझ्या सारख्या तरुणाला संधी दिली त्याबद्दल मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आभारी आहे. या मोठ्या पदासाठी पक्षश्रेष्ठींनी माझा विचार केला. त्यामुळे मी समाधानी आहे, असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :