Daund Crime : दौंड तालुक्यातील  (Daund) पारगाव येथे भीमा नदीत सात जणांचे मृतदेह सापडल्यानंतर  (Bhima River) महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यातच आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी पाच आरोपी अटकेत आहेत त्यातील चार पुरुष तर एक महिला आरोपी (Suicide)आहे. अंधश्रद्धेचं कुठलंही कारण आतापर्यंतच्या तपासात समोर आलेलं नाही, अशी माहितीदेखील पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.


पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले,  गंभीर प्रकार लक्षत घेता आम्ही अनेक पथक तयार केले होते. काही पुरावे समोर आले त्यातून लक्षात आलं की हा घातपात करुन त्यांचा खून करण्यात आला आहे. पाचही आरोपी नातेवाईक असून ते एकाच गावातील रहिवासी आहेत. आरोपी अशोक पवार यांचा भाऊ धनंजय पवार यांचा अपघातात मृत्यू झाला होता आणि त्याला कारणीभूत हे पवार कुटुंब होतं.  त्याचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आली आहे. सगळे आरोपी हे एकमेकांचे भाऊ बहिणभाऊ आहेत.


अशोक पवार, श्याम पवार, शंकर पवार, प्रकाश पवार, कांताबाई जाधव, या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हे पाचही जण मृत कुटुंबियांचे नातेवाईक आहेत. मोहन पवार (45), संगिता पवार (40), राणी फुलवरे, श्याम फुलवरे, रितेश फुलवरे, छोटू फुलवरे, कृष्णा फुलवरे,अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. 


अंधश्रद्धेतून हत्याकांड नाही; पोलिसांची माहिती


मोहन पवार यांचा मुलगा तीन महिन्यांपूर्वी अनिल पवार आणि त्याचा चुलत भाऊ धनंजय पवार हे एकत्र त्यांच्या पेरणे फाटा इथे असलेल्या सासुरवाडीला गेले असता त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात धनंजय पवार यांचा मृत्यू झाला. धनंजयचा मृत्यू हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांना होता. मोहन पवार आणि कुटुंबीयांनी काळी जादू केली आणि त्यामुळेच धनंजयचा मृत्यू झाला असं त्याच्या कुटुंबाला वाटत होता. मात्र अंधश्रद्धेतून हत्याकांड झाला आहे, असं पोलिस तपासात अजूनही पुढे आलं नाही आहे. यासंदर्भात सगळे पथकं तपास करत आहेत. 


बेशुद्ध करुन नदीत फेकलं...


मोहन आणि त्यांचे कुटुंबीय 17 जानेवारी रोजी भीमा नदीजवळ आल्यानंतर धनंजय याच्या घरच्यांनी त्यांची वाट अडवली. त्यांनी मोहन पवार, त्यांची पत्नी, मुलगी आणि जावयाला बेशुद्ध करुन त्यांच्यासोबत असलेल्या तीन मुलांनासह नदीत फेकलं. पाण्यात बुडून या सात जणांचा मृत्यू झाला. 


संबंधित बातमी