Protest by Brahmin Mahasabha : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेले ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात ब्राह्मण महा सभेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलनकर्ते जमले असून अमोल मिटकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गुरुजींच्या वेशात आलेले कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर शांतीपाठ करत असल्याचे निदर्शनास येत आहे. 


ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट


दरम्यान या आंदोलनामध्ये ब्राह्मण महासंघाच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झालेली पाहायला मिळाली.ब्राह्मण  महासंघाचे कार्यकर्ते हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला या वेळेस मोठा गोंधळ उडालेला पाहिला मिळाला. यावेळी काही गोंधळ होऊ नये म्हणून मोठा फौजफाटा देखील पाहायला मिळाला.


मिटकरींचा व्हिडिओ व्हायरल, ब्राह्मण समाजातून प्रचंड संताप


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली असल्याचा आरोप ब्राम्हण महासंघाकडून करण्यात येतोय. अमोल मिटकरींनी विविध मंत्रोच्चार जसे की हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे मंत्र उच्चारून खिल्ली उडवली, त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आपले विकट हास्य आवरले नाही. या “एबीपी माझा”ने दिलेल्या बातमीचा व्हिडिओ आता सोशल मीडिया मध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून ब्राह्मण समाजातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.


पुण्यात ब्राह्मण महासभेतर्फे आंदोलन, तर राष्ट्रवादीकडून मिटकरींचं समर्थन


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेले ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात ब्राह्मण महा सभेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलनकर्ते जमले असून अमोल मिटकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गुरुजींच्या वेशात आलेले कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर शांतीपाठ करत असल्याचे निदर्शनास येत आहे. 


मी कोणत्याही समाजाचा उल्लेख केला नाही - अमोल मिटकरी


ब्राम्हण संघाकडून मिटकरींच्या वक्तव्याचा विरोध करण्यात येत असून मिटकरींनी भाषणात लग्नविधीबाबत चुकीचा मंत्र सांगितला असं म्हटलंय. यावर अमोल मिटकरी यांनी एबीपी माझासोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी कोणत्याही समाजाचा उल्लेख केला नाही, भाषणात मी अपशब्द वापरले नाही,