आळंदी :  देवाच्या आळंदीत नवीन खरेदी केलेल्या इनोव्हा क्रिस्टा कारच्या आगमनाचा रील बनवण्यासाठी केळगाव हद्दीत बेदरकारपणे आणि धोकादायक स्टंट करणाऱ्यांवर अखेर आळंदी पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. याप्रकरणी आळंदी येथील महाराज महेश बाळकृष्ण मडके, बारामतीचा (Pune Crime News) जामिनावर बाहेर असलेला प्रसिद्ध रिलस्टार प्रतिक शिंदे, विशाल सातारे, यश मुगसे आणि इतर तीन जणांविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी महेश मडके यांनी नवीन इनोव्हा क्रिस्टा  MH 14 NS 4501 खरेदी केली होती. या वाहनाचा रील तयार करण्यासाठी आरोपींनी वाहने गोल-गोल फिरवून जीवघेणे (Pune Crime News) स्टंट केले, ज्यामुळे स्वतःच्या व तेथील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. याशिवाय, पूर्वपरवानगी न घेता ड्रोनद्वारे चित्रीकरण करून पिंपरी-चिंचवड सहपोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.(Pune Crime News)

Continues below advertisement

 Pune Crime News:  आळंदी पोलीस ठाण्यात  गुन्ह्याची नोंद 

नवीन चारचाकी वाहनाच्या आगमनानिमित्त सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी केळगाव (ता. खेड) हद्दीत सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे आणि धोकादायक स्टंट करणे आळंदीतील एक महाराज आणि एका रीलस्टारसह इतर काही जणांना चांगलेच महागात पडले आहे. पिंपरी-चिंचवड सहपोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करत विनापरवानगी ड्रोन शूटिंग करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी स्टंटसाठी वापरलेले चारचाकी वाहन जप्त केले आहे.

Pune Crime News:  काय आहे नेमकी घटना?

महेश बाळकृष्ण मडके (रा. गोपालपुरा, आळंदी) यांनी नुकतेच 07 ऑक्टोबर 2026 रोजी नवीन वाहन खरेदी केले होते. या नवीन कारच्या आगमनाचा आणि स्वागताचा रील तयार करण्यासाठी, आरोपींनी केळगाव येथे सार्वजनिक ठिकाणी आपली वाहने अत्यंत धोकादायक व बेदरकार पद्धतीने चालवली. कार गोल-गोल फिरवून जीवघेणे स्टंट करण्यात आले, यादरम्यान रस्त्यावर उपस्थित नागरिक व स्वतःच्या जीवितास मोठा धोका निर्माण करण्यात आला होता. विशेष म्हणजे, प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ड्रोनच्या माध्यमातून या संपूर्ण स्टंटचे चित्रीकरण करण्यात आले, जे पिंपरी-चिंचवड सहपोलिस आयुक्तांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे थेट उल्लंघन ठरले.

Continues below advertisement

Pune Crime News:  पोलीस कारवाई आणि गुन्ह्याची नोंद

या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात महाराज महेश बाळकृष्ण मडके, प्रतिक शिंदे (रीलस्टार, रा. बारामती), विशाल सातारे, यश मुंगसे आणि इतर 04 जणांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंदवला असून, स्टंटसाठी वापरण्यात आलेले नवीन चारचाकी वाहन देखील जप्त केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.