पुणे : सुनेकडून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या फरझान शेख यांचा उपचारादमरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला. सासूमुळे आराम मिळत नसल्याच्या कारणावरुन आफरीन शेख या महिलेने आपल्या मित्राच्या साथीने सासूला बेदम मारहाण केली होती.
पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत सून आफरीन शेख हिच्यासह मित्र आसिफ शेख याला अटक केली आहे. मारहानीनंतर आफरीन शेखने मित्राच्या मदतीने सासूला ससून रुग्णालयात दाखल केलं. तसंच सासू अपघातात जखमी झाली अशी खोटी माहिती डॉक्टरांना दिली.
संशय आल्यामुळे डॉक्टरांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. चौकशीदरम्यान पोलिसांनी सून, तिची बहिण आणि मित्राला पोलिसी खाक्या दाखवताच हा कट उघड़कीस आला.
मयत फरजाना शेख यांच्या मुलाचे सहा महिन्याआधीच लग्न झालं होतं. घरातील कामावरून सासू-सुनात नेहमी वाद होत असे. मुलगा दुपारी कामावर गेल्यानंतर सासू-सुना दोघीच घरात असायच्या. सासू नेहमी कामासाठी मागे लागते आणि तिच्यामुळे आपल्याला आराम मिळत नाही, या कारणावरून सुनेने सासूचा बदला घ्यायचं ठरवलं.
आफरीन शेख हिने सासूला मारहाण करण्यासाठी बहिण आणि मित्राची मदत घेतली. सुनेने दुपारच्या सुमारास सासूला पिण्यासाठी सुप करून दिले. त्यात तिने गुंगीचे औषध मिसळल्याने काही वेळातच सासू बेशुध्द पडली. त्यानंतर सासूला बेदम मारहाण केली.