एक्स्प्लोर

Vaishnavi Hagawane Death: करिश्मा हगवणे साथ देणाऱ्या निलेश चव्हाणचा व्हिडीओ व्हायरल; कमरेला पिस्तुल लावून मित्राच्या खाद्यांवर बसला, चुम्मा गाण्यावर धरला ठेका अन्...

Vaishnavi Hagawane Death: अगोदर देखील त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. ड्रंक अँड ड्राइव्ह केस ही दाखल आहे. कायदेशीर सर्व कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुणे: वैष्णवी हगवणेच्या (Vaishnavi Hagawane Death) आत्महत्येनंतर तिच्या 9 महिन्याच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी बंदूकधारी निलेश चव्हाणवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्वेनगर परिसरातील रहिवासी निलेश चव्हाण याच्याविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कस्पटे कुटुंबीय जेव्हा वैष्णवीच्या मुलाला घेण्यासाठी गेले तेव्हा निलेश चव्हाणनं बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे. पिस्तुलबाज निलेश चव्हाणचा कमरेला पिस्तुल लावून नाचतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. निलेश चव्हाण यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील आहे. अगोदर देखील त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. ड्रंक अँड ड्राइव्ह केस ही दाखल आहे. कायदेशीर सर्व कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, वारजेमध्ये गुन्हा दाखल आहे. धमकीचा गुन्हा दाखल केला आपल्या तपासात काही आढळून आले आहे. त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर आहे. निलेश चव्हाण आणि हगवणे यांचे लायसन रद्द करण्याचा प्रस्ताव दिला आहे. निलेश चव्हाण प्रकरणी नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी पंचनामे करत छापेमारी केली आहे. लॅपटॉप जप्त केला आहे. त्याच्या वडीलांना आणि भावाला चौकशीसाठी बोलावलं आहे. जे-जे लोक त्या दिवशी प्रत्यक्षदर्शी होते, ज्या दिवशी कस्पटे यांना धमकी दिली. त्या सर्वांना चौकशीसाठी बोलवू असंही संभाजी कदम यांनी म्हटलं आहे. तर  त्याला कायदाप्रमाणे नोटीस दिली आहे. त्याच्या भावाला नोटीस दिली आहे. चौकशीसाठी सहकार्य नाही केलं किंवा आला नाही तर कायदेशीर कारवाई करू अशी नोटीस दिल्याची माहिती आहे. 

निलेश चव्हाणचा नवा व्हिडिओ समोर 

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निलेश चव्हाणचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. कंबरेला बंदूक लावून चव्हाण नाचत असलेला व्हिडिओ समोर आला आहे. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. 

पोलिसांची दोन पथकं निलेश चव्हाणच्या शोधात

सध्या या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांची दोन पथकं निलेश चव्हाणचा शोध घेत असल्याची माहिती आहे. निलेश चव्हाणने बंदुकीचा धाक दाखवत वैष्णवीचं बाळ देण्यास नकार दिला होत. त्याबाबत त्याच्या विरुद्ध पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय, मात्र चव्हाण अजूनही फरार आहे. पोलीस अधिक तपास करत असून, संबंधित शस्त्र जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कलम 351(3) हे शारीरिक इजा करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीस उद्देशून असून, शस्त्र कायद्याखालील कलम 30 हे बेकायदेशीर शस्त्र बाळगणे वा त्याचा वापर केल्याबद्दल संबंधित आहे.

निलेश चव्हाणकडून बायकोचाही छळ

हगवणेंच्या गुन्ह्यांमध्ये साथ देणारा निलेश चव्हाणचीही पार्श्वभूमीही गुन्हेगारी प्रवृ़त्तीचा आहे. हगवणे कुटुंबीय जसा आपल्या सुनांचा छळ करायचे, तयास निलेश चव्हाणही आपल्या बायकोचा अतोनात छळ करायचा, निलेशची कुंडलीच एबीपी माझाच्या हाती लागलीय. त्यात निलेश किती विकृत्त प्रवृत्तीचाही आहे हे स्पष्ट झालंय. बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावून स्वत:च्याच बायकोचे आक्षेपार्ह व्हिडिओ निलेश बनवायचा. 3 जून 2028 ला निलेश चव्हाणचं लग्न झालं, जानेवारी 2019 निलेशच्या पत्नीला बेडरूममध्ये पंख्याला लटकलेलीसंशयास्पद वस्तू दिसली. विचारणा केली असता निलेशची उडवाउडवीची उत्तरं दिलं. फेब्रुवारी 2019 बेडरूमच्या एअर कंडिशनरमध्येही काही संशयास्पद वस्तू, त्यावरही उडवाउडवीची उत्तरं दिली. निलेशच्या लॅपटॉपमध्ये पत्नीला दोघांचे एकांतातले
व्हिडीओ आढळले,स्पाय कॅमेऱ्याने चित्रण केल्याचं तिला समजलं. 

निलेशच्या लॅपटॉपमध्ये इतरही मुलींसोबतचे त्याचे आक्षेपार्ह व्हिडीओ त्याच्या पत्नीने पाहिलं. पत्नीने जाब विचारला असता निलेशने चाकूने धमकावलं, आणि तिचा गळा दाबला. पत्नीने सासू सासऱ्यांना माहिती दिली त्यावेळी त्यांच्याकडून तिचाच छळ करण्यात आलं. अखेर छळाला कंटाळून निलेशच्या पत्नीने घर सोडलं, 14 जून 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला होता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तरुणानं स्वत:ला संपवलं, पुण्यातील जुन्नरमध्ये खळबळ
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तरुणानं स्वत:ला संपवलं, पुण्यातील जुन्नरमध्ये खळबळ
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Accident News: डंपरनं सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडलं, जागीच मृत्यू, संतापजनक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं काय घडलं?
डंपरनं सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडलं, जागीच मृत्यू, संतापजनक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Update: एकीकडे उष्णतेची लाट, दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज
एकीकडे उष्णतेची लाट, दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget