पुणे: मुंबईकडे जाणाऱ्या 'पुष्पक' एक्स्प्रेसमधून (Jalgaon Train Accident) प्रवास करणाऱ्यांसाठी आगीची अफवा अनेकांसाठी जीवघेणी ठरली आहे. सामान्य श्रेणीतील प्रवाशांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी दोन्ही बाजूंनी बाहेर उड्या घेतल्या आणि जीव वाचवण्यासाठी बाहेर गेले असताना तिथेच घात झाला. मुंबईकडून जळगाव स्थानकाकडे भरधाव वेगात येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेकांना चिरडलं. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. बुधवारी (ता. 22) सायंकाळी पाचच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील परधाडे (Jalgaon Train Accident) व माहिती या रेल्वेस्थानकांदरम्यान वडगाव गावालगत हा अपघात घडला. या घटनेबाबत आज सकाळी (ता. 23) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(Jalgaon Train Accident)


नेमकं काय म्हणाले अजित पवार?


पुण्यात माध्यामांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ही घटना अतिशय (Jalgaon Train Accident) दुर्दैवी आहे. असं लक्षात आलं की, उदलकुमार कुमार हा तीस वर्षाचा राहणार भिंगा, जिल्हा श्रवस्ती, राज्य उत्तर प्रदेश हे लखनऊ येथून लखनऊ ते मुंबई ती पुष्पक एक्सप्रेस गाडी आहे, यामध्ये 21 जानेवारीला नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी मुंबई येथे रोजगार मिळवण्याकरिता हे उदलकुमार निघाले होते. त्याच्यासोबत त्यांच्या पत्नीचे भाऊ विजयकुमार हा देखील होता. ते दोघेही सर्वसाधारण तिकीटाने सर्वसाधारण  बोगीच्या आसनावर बसलेले होते. त्यावेळी रेल्वेच्या रसोई यान बोगीचे चहा विक्रेते यांनी आग लागली म्हणून ओरड केली, त्या आरोळ्या यांना ऐकायला आल्या, त्यानंतर पूर्ण बोगीत गोंधळ उडाला. त्यांच्या बोगीसह आजूबाजूच्या बोगीमध्ये गोंधळ उडाला. त्यावेळी काही प्रवाशांनी घाबरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रेल्वेतून दोन्ही बाजूला उड्या मारल्या. तो प्रयत्न ते करत असताना गाडीचा स्पीड होता, रेल्वे वेगात असल्यामुळे इतर प्रवासी गाडीतून खाली उतरू शकत नव्हते. त्यामुळे कोणीतरी प्रवाशांनी रेल्वेतील साखळी ओढली.(Jalgaon Train Accident)


त्यानंतर गाडी थांबली. प्रवासी गाडीतून खाली उतरायला लागले. प्रवासी उतरून खाली इकडे तिकडे जात असताना शेजारी असलेल्या रुळावरून बेंगलोर न्यू दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगाने आली, आणि रेल्वेच्या रुळावर रुळावर असलेल्या लोकांना धडक देऊन पुढे काही अंतरावर जाऊन थांबली. या घटनेत एकूण 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत प्रवाशांचे शरीराची दुर्दशा झाली आहे. या घटनेमध्ये काही प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेमध्ये उदलकुमार आणि विजयकुमार यांना देखील धडक बसलेली आहे. उदलकुमार आणि विजयकुमार यांनी सहा ते सात प्रवासी मयत झालेले स्वतः पाहिले. अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे. 


आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. दहा लोकांची ओळख पटलेली आहे. दहा जणांचा मृतदेह सापडलेले आहे. तीन मृतदेहांच्या शरीराचे काही भाग वेगळे झालेले आहेत. त्यांच्या अंगावरून रेल्वे गेल्याने त्यांच्या शरीराचे तुकडे झालेले आहेत. यामध्ये एक पुरुष आणि दोन महिला आहेत. पुर्ण मृतदेह सापडलेल्या दहापैकी आठ पुरुष आणि दोन महिला आहेत अशा पद्धतीने ही दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना निव्वळ अफवांमुळे घडलेली आहे. या घटनेतील जखमींवर योग्य त्या उपचार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यास काही नेते लक्ष ठेवून आहेत घटनेनंतर काही वेळाने दोन्ही रेल्वे ज्या भागात जायला पाहिजे होत्या त्या भागामध्ये गेल्या आहेत, पुन्हा एकदा रेल्वे मार्ग पूर्वपदावर आणण्यात आला आहे, अशी माहिती अजित पवारांनी यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली आहे.